SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संजय घोडावत इन्स्टिट्यूट, उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल; २९ विषयाचा निकाल १०० टक्केविश्वप्रभा नागरी पतसंस्थेतील ८ कोटींच्या अपहाराची चौकशी करा; ठेवीदारांचा आक्रमक पवित्राकोल्हापूर : उपसा बंदीला २६ जूनपर्यंत पुन्हा शिथिलताक्रांती चौकाने घेतला मोकळा श्वास ; शहरातील युवकांच्याकडून नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचे अभिनंदन डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे उद्यापासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प’दहावी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्जाची मुदत वाढली; आता २ जुलैपर्यंत अर्ज करता येणारअवसायकांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाचा दणका; फणसवाडीच्या हनुमान सहकारी दूध संस्थेच्या याचिकेवर निर्णयकरवीर नगरीत खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवितयुवा पिढीला नशामुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध; प्रत्येक जिल्ह्यात होणार व्यसनमुक्ती केंद्र: मुख्यमंत्री फडणवीसजागतिक ऑलिम्पिक दिन: क्रीडा संस्कृतीचा उत्सव

जाहिरात

 

विश्वप्रभा नागरी पतसंस्थेतील ८ कोटींच्या अपहाराची चौकशी करा; ठेवीदारांचा आक्रमक पवित्रा

schedule23 Jun 26 person by visibility 151 categoryउद्योग

कोल्हापूर : विश्वप्रभा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ८,४८१ ठेवीदारांचे पैसे अडकले असून, संस्थेत ७.९८ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक अपहार झाल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले आहे. याप्रकरणी जबाबदार पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करून ठेवीदारांचे पैसे सुरक्षित करावेत, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र शेटे आणि त्यांच्या नातेवाईकांचा कारभारावर मोठा प्रभाव असून, संस्थेचा वापर वैयक्तिक कामांसाठी केल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. या अपहाराची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी ठेवीदारांनी सहकार विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली आहे. मात्र, कारवाईत होणाऱ्या विलंबामुळे ठेवीदार संतप्त आहेत.

अनेक वृद्ध, शेतकरी आणि आजारी ठेवीदारांचे पैसे अडकल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने मालमत्ता जप्ती व कायदेशीर कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवराज हेर्लेकर, अनिल मगदूम व उपस्थित ठेवीदारांनी दिला आहे.

यावेळी  दिनानाथ माणगांवे,  संभाजी पाटील, विवेक भुर्के, डॉ. बाळासो पाटील,  कल्पना पाटील,  विनय वदडी,  सुलोचना वदडी,  समर्थ वदडी,  धोंडिराम सिद आदी ठेवीदार उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes