SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संजय घोडावत इन्स्टिट्यूट, उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल; २९ विषयाचा निकाल १०० टक्केविश्वप्रभा नागरी पतसंस्थेतील ८ कोटींच्या अपहाराची चौकशी करा; ठेवीदारांचा आक्रमक पवित्राकोल्हापूर : उपसा बंदीला २६ जूनपर्यंत पुन्हा शिथिलताक्रांती चौकाने घेतला मोकळा श्वास ; शहरातील युवकांच्याकडून नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचे अभिनंदन डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे उद्यापासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प’दहावी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्जाची मुदत वाढली; आता २ जुलैपर्यंत अर्ज करता येणारअवसायकांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाचा दणका; फणसवाडीच्या हनुमान सहकारी दूध संस्थेच्या याचिकेवर निर्णयकरवीर नगरीत खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवितयुवा पिढीला नशामुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध; प्रत्येक जिल्ह्यात होणार व्यसनमुक्ती केंद्र: मुख्यमंत्री फडणवीसजागतिक ऑलिम्पिक दिन: क्रीडा संस्कृतीचा उत्सव

जाहिरात

 

अवसायकांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाचा दणका; फणसवाडीच्या हनुमान सहकारी दूध संस्थेच्या याचिकेवर निर्णय

schedule23 Jun 26 person by visibility 196 categoryउद्योग

▪️अवसायानात काढलेल्या ६४४ संस्थांना मोठा दिलासा*
       
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या ६४४ सहकारी दूध संस्थांना सहाय्यक निबंधक- दुग्ध यांनी अवसायानात काढले होते. अवसायकांच्या या निर्णयाला स्थगिती देत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दणका दिला आहे. अवसायनाच्या निर्णयाविरुद्ध फणसवाडी ता. भुदरगड येथील हनुमान सहकारी दूध संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आव्हान दिले होते. सर्किट बेंचच्या निर्णयामुळे अवसायकांच्या एकतर्फी निर्णयाला मोठा दणका बसला आहे. तसेच; अवसायानात निघालेल्या ६४४ सहकारी दूध संस्थांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात महत्त्वाचे म्हणजे, अवसायानात निघालेल्या संस्थांची अवसायनाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर संस्थांच्या अपरोक्ष सहाय्यक निबंधक- दुग्ध यांनी परस्पर गोकुळ दूध संघाकडून माहिती घेऊन त्या माहितीच्या आधारे संस्था अवसायानात काढल्याचा ठपकाही सर्किट बेंचने ठेवलेला आहे.
         
याबाबत अधिक माहिती अशी, फणसवाडी ता.भुदरगड  येथील हनुमान सहकारी दूध संस्थेने अवसायानात काढले होते. सहाय्यक निबंधक दूध यांच्या या एकतर्फी व अन्यायी अवसायन  आदेशाविरुद्ध हनुमान सहकारी दूध संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये धाव घेतली होती. संस्थेची ही याचिका सर्किट बेंचने मान्य करीत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
      
⚫ उच्च न्यायालयाची निरीक्षणे.....!
महाराष्ट्रासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणात उच्च न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे अशी....,
□ या प्रकरणात अवसायकांनी कोणतीही सखोल चौकशी केली नाही.
         
□ केवळ दूध पुरवठा कमी केला म्हणून संस्था अवसायानात काढता येत नाही.
     
□ संस्थेला म्हणणे मांडण्यासाठी कोणतीही संधी दिली नाही.
     
□ निव्वळ राजकीय हेतूने केलेली कार्यवाही.
        
हनुमान सहकारी दूध संस्थेच्यावतीने वरिष्ठ कायदेतज्ञ ॲड. एस. एस. पटवर्धन व त्यांचे सहकारी ॲड. भूषण मंडलिक यांनी काम पाहिले. सरकारपक्षाच्या वतीने ॲड. मनीष पाबळे यांनी काम पाहिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes