SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कर्करुग्ण उपचारासाठी महाकेअरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगोकुळ दूध संघाच्या प्रशासकांनी ४१० सभासद संस्थांवर केलेली कारवाई बेकायदेशीर व संघाच्या हिताविरुद्धअपात्र कर्जमाफीमधील ४४,७५९ शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित; केडीसीसी बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती बारामती पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवायज्ञ; वारकऱ्यांसाठी अन्नदान आणि आरोग्य सेवा योजनांचा लाभ समाजातील अंतिम घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य द्यावे : खासदार धैर्यशील मानेकोल्हापूर हादरले! भररस्त्यात कुख्यात गुंडावर गोळीबार; शहरात खळबळपरवान्याविना सुरू असलेले तीन व्यावसायिक आस्थापने महापालिकेकडून सीलई20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधात आप ने काढली गाडीची अंत्ययात्रा विश्वचषकात 'मेसी'मॅजिक! अंतिम ७ मिनिटांत अर्जेंटिनाचा थरारक विजय; फायनलमध्ये स्पेनशी होणार गाठजागतिक पाळीव प्राणी दिन: मुक्या जीवांचे प्रेम आणि आपले भावनिक नाते

जाहिरात

 

कर्करुग्ण उपचारासाठी महाकेअरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule16 Jul 26 person by visibility 107 categoryआरोग्य

महाकेअर अंतर्गत नागपूरमध्ये 'नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट' उपकंपनी स्थापन करणार

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांवर उपचारासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनी (महाकेअर)च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनी संचालक मंडळाची पहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, सचिव विकासचंद्र रस्तोगी, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक, वैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमार, आरोग्य आयुक्त संजय काटकर, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय चंदनवाले, मानद सल्लागार व सदस्य डॉ. कैलाश शर्मा, नवीन खत्री, उपसचिव तथा सदस्य संदीप ढाकणे आदी उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञान, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि राज्य-शासित एल 2 व एल 3 कर्करोग रुग्णालयांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला निदानापासून उपचारापर्यंत समान व जागतिक दर्जाची कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाकेअर कंपनीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्या माध्यमातून राज्यातील कर्करुग्णांची संख्या कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे महाकेअरसाठी मनुष्यबळ उभारताना उच्च दर्जाची क्षमता असलेले मनुष्यबळ घ्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

महाकेअर अंतर्गत नागपूमध्ये ‘नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट’ या उपकंपनीची स्थापना करण्यास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.  महाकेअर कंपनीच्या कॉर्पस निधीसाठी 100 कोटी रुपये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून देण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधी उभारण्यास व स्वीकारणे, महाकेअरच्या कार्यालयासाठी जी.टी.रुग्णालय येथील इमारतीत जागा उपलब्ध करून देणे, कंपनीचे लेखापरीक्षक व कंपनी सचिवांची नियुक्ती करणे, सल्लागार नेमणे आदी विषयांनाही संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

ऑटोमिक एनर्जीची पूर्व मान्यता घेण्याची आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

यावेळी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलबरोबर तांत्रिक सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. टाटा मेमोरियलचे खत्री व महाकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंदनवाले यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

🟣महाकेअरची व्याप्ती
▪️ महाकेअर कंपनीमार्फत विकेंद्रीत सेवा प्रणालीद्वारे कर्करोर उपचार पद्धतीत परिवर्तन होणार आहे.

▪️ याअंतर्गत टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे सर्वोच्च संशोधन व कर्करोग उपचार केंद्र,

▪️मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, नाशिक व अमरावती येथे जिल्हास्तरीय सर्वसमावेश कर्करोग उपचार केंद्रे

▪️ मुंबई (कामा आल्ब्लेस), रत्नागिरी, सातारा, बारामती, जळगाव, यवतमाळ, अंबाजोगाई (बीड), ठाणे व शिर्डी येथे निदान व डे-केअर केंद्रांची उभारणी

▪️महाआरोग्य प्रकल्प माध्यमातून राज्यव्यापी अंमलबजावणी

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes