SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कर्करुग्ण उपचारासाठी महाकेअरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगोकुळ दूध संघाच्या प्रशासकांनी ४१० सभासद संस्थांवर केलेली कारवाई बेकायदेशीर व संघाच्या हिताविरुद्धअपात्र कर्जमाफीमधील ४४,७५९ शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित; केडीसीसी बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती बारामती पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवायज्ञ; वारकऱ्यांसाठी अन्नदान आणि आरोग्य सेवा योजनांचा लाभ समाजातील अंतिम घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य द्यावे : खासदार धैर्यशील मानेकोल्हापूर हादरले! भररस्त्यात कुख्यात गुंडावर गोळीबार; शहरात खळबळपरवान्याविना सुरू असलेले तीन व्यावसायिक आस्थापने महापालिकेकडून सीलई20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधात आप ने काढली गाडीची अंत्ययात्रा विश्वचषकात 'मेसी'मॅजिक! अंतिम ७ मिनिटांत अर्जेंटिनाचा थरारक विजय; फायनलमध्ये स्पेनशी होणार गाठजागतिक पाळीव प्राणी दिन: मुक्या जीवांचे प्रेम आणि आपले भावनिक नाते

जाहिरात

 

बारामती पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवायज्ञ; वारकऱ्यांसाठी अन्नदान आणि आरोग्य सेवा

schedule16 Jul 26 person by visibility 165 categoryसामाजिक

कोल्हापुर : संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्यानिमित्त बारामती येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वारकर्‍यांसाठी विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी उपस्थित राहून वारकर्‍यांसमवेत विठ्ठल नामाचा गजर करत पालखी सोहळ्यात सहभाग नोंदविला.

  संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्यानिमित्त बारामती येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वारकर्‍यांसाठी विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी उपस्थित राहून वारकर्‍यांसमवेत विठ्ठल नामाचा गजर करत पालखी सोहळ्यात सहभाग नोंदविला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वारकर्‍यांचे स्वागत करत त्यांना खाऊचे वाटप केले. हजारो वारकर्‍यांची सेवा करण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून, वारकरी संप्रदायातील सेवाभावाची परंपरा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासोबतच, भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वैद्यकीय सहायता कक्ष  उभारण्यात आला होता.

 या कक्षाद्वारे वारकर्‍यांनाप्राथमिक आरोग्य सेवा, आवश्यक औषधे तसेच वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. पालखी मार्गावरील वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम विशेषत्वाने राबविण्यात आला. या सेवा उपक्रमाला वारकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजसेवा, मानवता आणि वारकरी परंपरेतील निस्वार्थ सेवाभाव जपण्याचा संदेश भारतीय जनता युवा मोर्चाच्या या उपक्रमातून देण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलवनकर, भाजपा युवा नेते सचिन जायभाई पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes