SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​‘त्या’ घटनेने पेठवडगाव सुन्न: भरदिवसा, भररस्त्यात पत्नीचा बळी; आरोपी पतीच्या शोधात पोलीसपंचगंगा घाट व शाहू मिल परिसराची महापौर रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणी; आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशएसआयआर मोहिमेला मुदतवाढ द्या; सतेज पाटील यांची मागणी शैक्षणिक गुणवत्तेत कोरे डिप्लोमाची पुन्हा एकदा बाजी; महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून 'अतिशय उत्कृष्ट' मानांकनपंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज सुरूकोल्हापूर मंडळातील नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांची विशेष तपासणी; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईकोल्हापुरात मोठी कारवाई: १५ पोलीस ठाण्यांमधील ५१५ किलोहून अधिक अमली पदार्थ नष्ट!कोल्हापुरात एलसीबीची मोठी कारवाई: ४ सराईत चोरे जेरबंद, १० गुन्हे उघडकीस! ५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्तडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या १६ विद्यार्थ्यांची नामंकित कंपन्यामध्ये निवडकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 31.62 मिमी पावसाची नोंद

जाहिरात

 

पंचगंगा घाट व शाहू मिल परिसराची महापौर रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणी; आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

schedule08 Jul 26 person by visibility 176 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : कोल्हापूर शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढून 36 फुटांवर पोहचली असून ती इशारा पातळीच्या दिशेने जात आहे. या पार्श्वभूमीवर महापौर रुपाराणी निकम यांनी आज पंचगंगा नदी घाटा परिसराला भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली. संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेऊन सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.

 पूरबाधीत क्षेत्रांतील नागरीकांसाठी निवारा केंद्रे सज्ज ठेवण्याबरोबरच पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या भागातील नागरीकांना वेळेत स्थलांतरीत करण्याबाबत जनजागृती करण्याचे निर्देशही महापौरांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिले.

 यानंतर ऐतिहासिक छत्रपती शाहू मिलची कोटीतीर्थ तलावाकडे जाणारी संरक्षण भिंत कमकुवत झालेने रात्री अचानक ढासळली होती. या ढासळलेल्या भिंतीची महापौर रुपाराणी निकम यांनी पाहणी करुन राज्य वस्त्रोद्योग महामंडाळाच्या स्थानिक व्यवस्थापकास धोकादायक भिंत उतरुण घेण्याच्या सूचना दिल्या. जेणेकरुन याठिकाणी पदाचाऱ्यास अथवा गाडी धारकास कोणतीही दुर्घटना होऊ नये याची दक्षता घ्यावी. यासाठी उर्वरीत भिंतीचे स्थैर्यता तपासून घ्याव्यात व महामंडाळाच्या वरिष्ठ स्तरावर याची माहिती द्यावी असे सांगितले. यानंतर राजारामपूरी येथील विभागीय कार्यालय क्रं.3 ला भेट देऊन याठिकाणी असलेल्या कार्यालयांची पाहणी केली.  

यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, सहा.संचालक नगररचना प्रशांत भोसले, शहर अभियंता रमेश मस्कर, नगरसेविका सौ.माधूरी व्हटकर, सौ.रेखा उगवे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, अरुणकुमार गवळी, उपशहर रचनाकार एन एस पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, पदमल पाटील, मीरा नगीमे आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes