SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सेवा संकल्प इनोव्हेशन चॅलेंज अंतर्गत जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धा उत्साहातमनपाडळे ल.पा. तलावातून शेतीसाठी पाणी उपशास बंदीकरवीर व कागल तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; आमदार सतेज पाटील यांची मागणीराऊत हे राज्याचे मुक्त विद्यापीठ, त्यांनी आमच्या पक्षात नाक खुपसू नये; मंत्री मुश्रीफांचा घणाघातकागल व गडहिंग्लज तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरणदुष्काळी यादीत वंचित तालुक्यांचा समावेश करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू : आमदार सतेज पाटील यांचा इशाराडीकेटीईमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वरदीपोत्सव- मराठी गीतांचा‘ कार्यक्रम उत्साहात जागतिक न्यूमोनिया दिन: आरोग्याची काळजी आणि जनजागृतीची गरजराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बारामतीच्या खेळाडूंची दैदीप्यमान कामगिरी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून खेळाडूंचा गौरवभगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन

जाहिरात

 

करवीर व कागल तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; आमदार सतेज पाटील यांची मागणी

schedule12 Nov 26 person by visibility 236 categoryराज्य

कोल्हापूर : सन २०२६ च्या खरीप हंगामातील दुष्काळी तालुक्यांच्या यादीत करवीर आणि कागल या दोन तालुक्यांचाही समावेश करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी  जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

​राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील २६५ दुष्काळी तालुके घोषित केले आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा व चंदगड या ६ तालुक्यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात  शाहूवाडी आणि शिरोळ या दोन तालुक्यांना यादीत स्थान मिळाले. मात्र, जिल्ह्यातील करवीर, कागल, गडहिंग्लज आणि हातकणंगले हे चार तालुके या मदतीपासून वंचित राहिले होते.

​जिल्हा प्रशासनाकडून गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुक्यांचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव यापूर्वीच शासनास सादर करण्यात आल्याचे समजते. त्याच धर्तीवर, खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होण्यापूर्वी करवीर आणि कागल तालुक्यातील पिकांची प्रत्यक्ष वस्तुस्थितीजन्य पाहणी करावी आणि या दोन्ही तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत करण्यासाठी शासनाला त्वरित प्रस्ताव पाठवावा, अशी विनंती आमदार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. या पत्राची प्रत मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांनाही पाठवण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes