SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विद्यापीठात एक दिवसीय कार्यशाळाभाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर उत्साहात प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्या : सतेज पाटील ‘गोकुळ’ कडून महिला दूध उत्पादकांसाठी ‘नारी सन्मान विमा योजना’ : चेअरमन नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी 14 वा दीक्षांत समारंभ; पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीविद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी 'केआयटी' प्रशासन खंबीर; दोषी प्राध्यापकावर तातडीने निलंबनाची कारवाई!महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमइंधन टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनकोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागरविद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

जाहिरात

 

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

schedule06 Mar 26 person by visibility 174 categoryसामाजिक

कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था आणि भाजपच्यावतीने,  कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये मोफत प्रशिक्षण शिबीर झाले. सध्याच्या महागाईच्या दिवसात पुरूषांच्याबरोबरीने महिलांनी उद्योग- व्यवसाय सुरू करत कुटूंबाला हातभार लावावा, यासाठी भागीरथी महिला संस्था प्रयत्नशिल आहे. महिलांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून, आर्थिकदृष्टया सक्षम बनावे, असे आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी केले.
भारतीय जनता पार्टी आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने, कोल्हापुरातील देवकर पाणंद परिसरातील महिलांसाठी, मोफत प्रशिक्षण शिबीर झाले. 

भागीरथीच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक, नगरसेविका पुर्वा राणे, अर्चना कोराणे यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरवात झाली.

 भागीरथी संस्थेने आजवर २५ ते ३० हजार महिलांना उद्योगशील बनवले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासह, भागीरथी पतसंस्थेच्यावतीने उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते. तसेच महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भागीरथी संस्था प्रयत्न करते. आजवर शेकडो महिला स्वयंपूर्ण बनल्या आहेत. यापुढेही महिला सक्षमीकरणाची चळवळ कायम सुरू असेल, असे अध्यक्षा अरूंधती महाडिक यांनी सांगितले.

 त्यानंतर अश्‍विनी वास्कर यांनी महिलांना नीळ, फिनेल, वॉशिंग पावडर, सेंट, साबण, अगरबत्ती, केक, चौपाटी पदार्थ अशा विविध पदार्थांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. तर नगरसेविका पुर्वा राणे यांनीही उपस्थित महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यावेळी नम्रता देसाई, प्रज्ञा इंगवले यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes