SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विद्यापीठाच्या ६३व्या दीक्षान्त सोहळ्यास ग्रंथदिंडी, ग्रंथ महोत्सवाने प्रारंभ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’; ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादशासकीय वसतिगृह व आधार योजनांसाठी अर्ज करण्यास १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढराज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलीमाजी सैनिकांच्या आरोग्यसेवेसाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल कटिबद्ध : कुलगुरू कर्नल (नि.) डॉ राकेशकुमार शर्मा यांची ग्वाही कोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएच.डी. पदवी प्रदानघोडावत फौंडेशन तर्फे प्रीतम आनंद वृद्धाश्रमास मदतशिरोळ तालुका क्रीडा संकुलासाठी ५ कोटींचा निधी मंजूर; आमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा ; आणखीन ५o कोटींचा प्रस्ताव कॅबिनेटकडे सादर राष्ट्रवादी भवन येथे ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात; २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजलीनिधीअभावी बंद पडलेले 'आपला दवाखाने' तात्काळ सुरू करा; अन्यथा आरोग्यमंत्र्यांची गाडी अडवू

जाहिरात

 

‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’; ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

schedule26 Nov 26 person by visibility 210 categoryराज्य

कोल्हापूर : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’, ‘भारतीय संविधानाचा गौरव आणि पर्यावरण संरक्षणाचा जागर’ या संकल्पनेतून किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहिमेचे आयोजन आज किल्ले पन्हाळगड येथे करण्यात आले. ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ या घोषवाक्याखाली राबविण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गड व किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहिमेला नागरिक, विद्यार्थी आणि विविध संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, समाजकल्याण विभाग, नगरपरिषद प्रशासन विभाग, महसूल विभाग, पर्यटन विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सकाळी ७ वाजता किल्ले पन्हाळगडावरील स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. सज्जा कोटी, तीन दरवाजा, धान्याचे कोठार यांसह किल्ल्यावरील विविध ऐतिहासिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत पन्हाळा विद्यामंदिर, पन्हाळा पब्लिक स्कूल, विक्रम पाटील आणि राजा शिवछत्रपती परिवार, कोल्हापूर यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी सांगलीचे शाहीर देवानंद माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंगावर शहारे आणणाऱ्या पोवाड्याचे सादरीकरण केले.

यानंतर खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. संविधान प्रतीला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा जयश्री पोवार, सुजित चव्हाण, तहसीलदार माधवी शिंदे, मुख्याधिकारी चेतन माळी, उत्तम कांबळे, समाजकल्याण विभागप्रमुख संजय भोसले, जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य देवेंद्र खराडे व रामेश्वर पत्की, नगरसेविका आडनाईक, गवंडी व मुजावर, भारत चौगले, गोरख लोंढे, इंद्रजीत चौगले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या मनोगतातून संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश प्रत्येकाने स्वतःपासून अमलात आणण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आदरांजली वाहून त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण केले.

या उपक्रमाच्या माध्यमातून ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. ऐतिहासिक वारसा जपण्याबरोबरच संविधानातील मूल्यांचा सन्मान आणि पर्यावरणाप्रती सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, सुशिलकुमार शिंदे, क्षेत्र अधिकारी रोहिदास मातकर व कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमास नगरपरिषद प्रशासन विभाग, पन्हाळा, पोलीस विभाग, छायाचित्रकार, पत्रकार आणि इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे निवेदन प्रल्हाद पाटील यांनी केले.

संविधानाचा सन्मान, ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा त्रिवेणी संगम साधणारा हा उपक्रम किल्ले पन्हाळगडाच्या ऐतिहासिक भूमीत उत्साहात संपन्न झाला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes