SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विद्यापीठाच्या ६३व्या दीक्षान्त सोहळ्यास ग्रंथदिंडी, ग्रंथ महोत्सवाने प्रारंभ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’; ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादशासकीय वसतिगृह व आधार योजनांसाठी अर्ज करण्यास १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढराज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलीमाजी सैनिकांच्या आरोग्यसेवेसाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल कटिबद्ध : कुलगुरू कर्नल (नि.) डॉ राकेशकुमार शर्मा यांची ग्वाही कोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएच.डी. पदवी प्रदानघोडावत फौंडेशन तर्फे प्रीतम आनंद वृद्धाश्रमास मदतशिरोळ तालुका क्रीडा संकुलासाठी ५ कोटींचा निधी मंजूर; आमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा ; आणखीन ५o कोटींचा प्रस्ताव कॅबिनेटकडे सादर राष्ट्रवादी भवन येथे ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात; २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजलीनिधीअभावी बंद पडलेले 'आपला दवाखाने' तात्काळ सुरू करा; अन्यथा आरोग्यमंत्र्यांची गाडी अडवू

जाहिरात

 

शासकीय वसतिगृह व आधार योजनांसाठी अर्ज करण्यास १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

schedule26 Nov 26 person by visibility 138 categoryशैक्षणिक

◼️विद्यमान विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

कोल्हापूर : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तसेच भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यमान विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज सादर करण्यास १० डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनीता नेर्लीकर यांनी दिली.

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात बारावीनंतर व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना यापूर्वी ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

दरम्यान, २७ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वार्षिक ४३ हजार रुपये, तर विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५७ हजार रुपये लाभ देण्यात येतो. तालुका क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ३८ हजार व ५० हजार रुपये वार्षिक लाभ मिळतो.

तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या पात्र विद्यार्थ्यांना महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालयांसाठी वार्षिक ५७ हजार रुपये, तर तालुका क्षेत्रातील महाविद्यालयांसाठी ५० हजार रुपये लाभ देण्यात येतो.

जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यमान पात्र विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अर्ज सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, तिसरा मजला, कोल्हापूर या कार्यालयात १० डिसेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत. पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes