SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘पुणे –मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्दमतमोजणी दिवशी मिरवणूक, रॅली, डीजे, फटाके व गुलालावर बंदीमहापौर व उप-महापौर निवड प्रक्रियेच्या तयारीची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणीविविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार, रोटरीच्या माजी अध्यक्षा अरूंधती महाडिक यांची माहितीमहावितरण पुनर्विलोकन याचिकेची सुनावणी पुढे ढकला : सतेज पाटील यांची मागणी 5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी; प्रचार संपुष्टात येणारजिल्ह्यातील मतमोजणी केंद्र परिसरात कलम 163 लागूमतदान केंद्र परिसरात मोबाईल, वाहन, शस्त्रांवर निर्बंध6 व 7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील काही शाळांना सुट्टी7 फेब्रुवारी रोजी मतदानासाठी कामगारांना सुट्टी; सुट्टी न दिल्यास तक्रार करण्याचे आवाहन

जाहिरात

 

जयसिंगपूर, हेरवाड व शिरदवाड या आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन

schedule04 Feb 26 person by visibility 116 categoryआरोग्य

कोल्हापूर : राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (NQAS) उपक्रमांतर्गत शिरोळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर तसेच आरोग्य उपकेंद्र शिरदवाड व हेरवाड यांनी राज्यस्तरीय मूल्यांकनात यश संपादन केले असून, आता ही केंद्रे राष्ट्रीय स्तरावरील अंतिम प्रमाणपत्रासाठी पात्र ठरली आहेत.

गुणवत्तापूर्ण उपचार, रुग्ण सुरक्षा, संसाधन व्यवस्थापन आणि अद्ययावत स्वच्छता या निकषांवर कोल्हापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर तसेच आरोग्य उपकेंद्र शिरदवाड व हेरवाड या केंद्रांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. 

ही योजना चार टप्यामध्ये राबविण्यात येते. पहिला टप्पा स्वमुल्याकंन, दुसरा टप्पा जिल्हास्तरीय मुल्याकंन, तिसरा टप्पा राज्यस्तरीय मुल्यांकन व चौथा टप्पा राष्ट्रीय मुल्यांकन. 

विशेष यश: कायाकल्प योजना २०२५ जिल्हा गुणवत्ता आश्वासन उपक्रमांतर्गत 'कायाकल्प' योजनेत कोल्हापूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
23 प्राथमिक आरोग्य केंद्रे: सर्व निकष पूर्ण करून अंतिम राष्ट्रीय मूल्यांकनासाठी पात्र.
91 आरोग्य उपकेंद्रे: जिल्हास्तरीय मूल्यांकनात चमकदार कामगिरी करत 'बक्षीस अनुदाना'साठी पात्र.
 उद्देश: सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील स्वच्छता, संसर्ग नियंत्रण आणि सुशोभीकरण वाढवणे.

या यशासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी हर्षला वेदक, अति. जिल्हा शल्यचिकित्सक एस. बी. थोरात, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने यांचे मार्गदर्शन मिळाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes