घाटगे- मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनीही एकसंध व्हावे; मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन
schedule09 May 26 person by visibility 132 categoryराज्य
▪️व्हन्नुरमध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण समारंभ
व्हन्नुर :आणखी किती वर्षे संघर्ष करत रहायचे. त्यामुळे कागल तालुक्यात विकासाचे ध्येय घेऊन एकदिलाने एकसंध होवून माजी आमदार संजयबाबा घाटगे, राजे समरजितसिंह घाटगे आणि आपण एकत्र आलो आहोत. त्याप्रमाणे गावागावातील कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकत्र या, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
व्हन्नुर (ता.कागल) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व माँडेल (स्मार्ट) अंगणवाडी इमारतीचा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील हे होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, शेतमाल बाहेर काढण्यासाठी आणि गावात जागेअभावी शेताशिवारात घरे बांधून राहणाऱ्या कुटुंबाना ये जा करण्यासाठी मजबूत रस्ते गरजेचे आहेत. यासाठी बळीराजा पाणंद रस्ता योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन येत्या तीन वर्षात मतदारसंघातील सर्वच पाणंद रस्ते पुर्ण करु.
*लाडक्या बहिणींसाठी*
मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बँकेत लाडक्या बहिणीचे अनुदान येणाऱ्या महिलांना उद्योग-व्यवसाय, मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा बँकेतून एकाचवेळी विनातारण ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे लाडक्या बहिणीच्या अनुदानातून दरमहा १,२६८ रुपयांप्रमाणे परत करायचे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या सुर्यघर योजनेला गती देण्यासाठी जिल्हा बँकेतून एक ते तीन किलो वँटनुसार कर्ज दिले जाणार आहे. एक किलोवँटला ३८ हजार प्रमाणे येणारे शासनाचे अनुदान या कर्जखात्यात वर्ग होणार आहे. तर उर्वरित रक्कम दरमहा ५०० रुपयेप्रमाणे तीन वर्षांत परत करायचे आहेत. बँकेच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सौरभ पाटील, सरपंच सौ. पुजा मोरे, महेश चौगुले, नेताजी मोरे, बाळासाहेब तुरंबे, बळवंतराव माने, युवराज पाटील, अमोल नवाळे, सुरेश बोभाटे, रणजीत मोरे, गणपतराव हजारे, रामचंद्र माने, निलकुमार चौगुले, जगन्नाथ संकपाळ, संभाजी खापणे, धोंडीराम खोत, गौतम कांबळे, रविंद्र कांबळे यांच्यासह ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक सरपंच पूजा रणजित मोरे यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार प्रा रविंद्र कांबळे यांनी मानले.