SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राधानगरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा मोठा दणका; जुगार अड्ड्यावर छापा टाकून ८ लाखांचा मुद्देमाल जप्त!समाजशास्त्राची जाणीव असलेल्या नेतृत्वाकडूनच समाज परिवर्तन : पृथ्वीराज चव्हाणविद्यार्थ्यांनी शाश्वत विकासावर अभ्यास करावा : डॉ विजय कुंभार‘विज्ञानातील महिला’ विषयावर विद्यापीठात विशेष ग्रंथप्रदर्शनशिक्षणशास्त्र अधिविभागात दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजनडॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कारपोषण अभियानात कोल्हापूरचा तिसरा क्रमांककोल्हापूरच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा विमानतळ उचलेल अशा सेवा आणि सुविधा उभाराव्यातस्मार्ट मीटर बसविणे सक्तीचे करु नये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची महावितरणकडे मागणीकोल्हापुरात 'माझं शहर, माझी जबाबदारी' स्वच्छता अभियान यशस्वी; महापौर रूपाराणी निकम यांनी मानले कोल्हापूरकरांचे आभार

जाहिरात

 

राधानगरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा मोठा दणका; जुगार अड्ड्यावर छापा टाकून ८ लाखांचा मुद्देमाल जप्त!

schedule28 Feb 26 person by visibility 278 categoryगुन्हे

कोल्हापूर : जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने  राधानगरी तालुक्यातील तिटवे येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली. या छाप्यात ८ लाख २ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक  योगेशकुमार व अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. तिटवे गावच्या हद्दीत अरविंद बुजरे यांच्या शेताजवळ उघड्यावर जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस अंमलदार संजय देसाई व राजू कोरे यांना मिळाली होती. त्यानुसार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.
कारवाईमध्ये रोख रक्कम: ६७,१८० रुपये, मोबाईल संच: ०५ नग,  दुचाकी: ०९ मोटार सायकली, इतर साहित्य: जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. 

या कारवाईत संशयित चंद्रकांत पाटील (आदमापूर), शंकर पोवार (तुरंबे), नवनाथ वाईंगडे (सरवडे), शुभम चव्हाण (चंद्रे), तुळशीदास कांबळे (बेले), विनोद पाटील, अशोक पोवार आणि प्रविण गोजारे या ८ जणांसह त्यांच्या इतर साथीदारांवर राधानगरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या यशस्वी कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह संजय देसाई, राजू कोरे, सागर चौगुले व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes