मोफत तुर बियाणे संच वाटप
schedule03 Jun 26 person by visibility 204 categoryराज्य
कोल्हापूर : कृषी विभागामार्फत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यातील पात्र इच्छुक शेतकऱ्यांना खरीप हंगामात तुर पिकाचे बियाणे संच / सीडकीट (5 वर्षाच्या आतील वाणाचे 4 किलो प्रती सीडकीट याप्रमाणे) 300 संख्या सीडकीट इतके लक्षांक प्राप्त झाले आहे. तुर बीयाणे संच / सीडकीट ( वाण- गोदावरी तूर / BDN 2013-41) इच्छुक शेतक-यांना 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत.
यासाठी शेतक-यांचा फार्मर आयडी (Farmer ID) असणे बंधनकारक आहे. बियाणांचा वापर पेरणीसाठी करणे बंधनकारक आहे. अर्ज फक्त Mahadbt पोर्टलवरूनच स्वीकारले जातील. जास्तीत जास्त इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत.
तांत्रिक माहितीसाठी आपण आपल्या गावातील सहाय्यक कृषि अधिकारी / कृषी सेवक किंवा तालुका कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले.