SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
खिद्रापूर मंदिर संवर्धनासोबतच स्थानिकांच्या हक्कांचेही संरक्षण व्हावे : आमदार यड्रावकर'आम्ही एकत्र लढणार!': राहुल गांधी आणि विरोधकांची गांधी स्मृतीस्थळावर NEET च्या मृतांना आदरांजलीबीएचएमएस आणि सीसीएमपी पात्र डॉक्टरांची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार : मंत्री हसन मुश्रीफशिवाजी विद्यापीठाचा कौशल्य विकासासाठी हुबळीच्या ट्रस्टसमवेत सामंजस्य करारशिवाजी विद्यापीठात लोकमान्य टिळक जयंतीआयटीआय प्रवेशासाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेतयेत्या रविवारी कारगिल विजय दिवसाचे आयोजन“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” : महापौर रूपाराणी निकमकोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम: गगनबावाड्यात सर्वाधिक पाऊस, पंचगंगा नदीची पातळी इशारा पातळीच्या खालीस्वराज्याचा हुंकार: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

जाहिरात

 

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ. सचिन कांबळे यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक

schedule22 Jul 26 person by visibility 278 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे, कोल्हापूर येथील रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. सचिन कांबळे यांनी आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

व्हिएतनाममधील टॉन डक थँग विद्यापीठ, हो ची मिन्ह सिटी येथे दि. १२ ते १५ जुलै २०२६  या कालावधीत आयोजित प्रगत पदार्थ व शाश्वत विकास विषयक आंतरराष्ट्रीय परिषद (आयकॅमएसडी–२०२६) मध्ये तोंडी संशोधन सादरीकरण विभागात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या उत्कृष्ट संशोधन कार्याची दखल घेत हा सन्मान टॉन डक थँग विद्यापीठाच्या अध्यक्षांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

डॉ. कांबळे यांनी झिंक ऑक्साईड आणि मँगनीज ऑक्साईड यांच्या संमिश्राचा वापर करून ऊर्जा साठवणुकीसाठी अत्याधुनिक अतिजलद विद्युतभार साठवणूक यंत्र (सुपर कॅपेसिटर) विकसित करण्याचे संशोधन सादर केले. ऊर्जा साठवणूक, अक्षय ऊर्जा आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या कार्यक्षमतेसाठी हे संशोधन अत्यंत उपयुक्त ठरणार असून भविष्यात ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता या संशोधनात आहे.

डॉ. सचिन कांबळे यांचे हे यश केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नसून संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या संशोधनपरंपरेचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान आहे. तसेच विज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना या यशातून निश्चितच मिळणार आहे.

या संशोधन कार्यासाठी संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, केंद्रीय विद्यापीठ, कर्नाटकचे डॉ. शेषनाथ भोसले, डॉ. कपिल राजहंस, डॉ. राजू मगदूम, डॉ. देवानंद कांबळे आणि इतर मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

डॉ. सचिन कांबळे यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल शैक्षणिक, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, संजय घोडावत इन्स्टिट्यूटसाठी ही अभिमानाची आणि गौरवास्पद बाब मानली जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes