आयटीआय प्रवेशासाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत
schedule23 Jul 26 person by visibility 108 categoryराज्य
कोल्हापूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकूण 30 व्यवसाय (ट्रेंड) उपलब्ध असून त्यामध्ये एक वर्ष व दोन वर्ष मुदतीचे विविध अभ्यासक्रम सुरू आहेत. इच्छुक उमेदवारांनी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज भरून शासकीय आयटीआय येथे अर्ज निश्चित करून घ्यावा, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.
शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 90 टक्के, तर जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे.
संस्थेत बेसिक कॉस्मेटोलॉजी, आरेखक (स्थापत्य व यांत्रिकी), वीजतंत्री, जोडारी, आयसीटीएसएम, यंत्रकारागीर, मोटार मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, रंगारी, तारतंत्री, वुड वर्क टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट (COPA), प्लंबर, शिवण तंत्रज्ञान, स्टेनोग्राफी, टूल अँड डाय मेकर आदी विविध व्यवसायांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्यात आले आहे.