SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात रेशन कार्डधारकांचा एल्गार; महागाई आणि रेशन कपातीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकअंजली पाटील यांना 'गीताव्रती' पदवीने गौरवजागतिक आरेखन दिन: सर्जनशीलतेचा उत्सवकोल्हापूर: भुदरगडमधील घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोरट्यास केली अटकआयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांची हॉकी स्टेडियम, गांधीनगर व कसबा बावडा येथील कामांची पाहणीजागतिक बौद्धिक संपदा दिननदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकुंभमेळा कामांना अधिक गती देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसबडोदा बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या कबनूरकर भावंडांचे यशआद्य शंकराचार्य जयंती उत्सव रविवारपासून; आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; एजंटसह दोघांना अटक

schedule24 Apr 26 person by visibility 338 categoryगुन्हे

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्ह्यात लिंग चाचणी आणि भ्रूणहत्या रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पन्हाळा तालुका आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. माजगाव पैकी खोतवाडी येथे कोणत्याही वैध वैद्यकीय पदवीशिवाय 'श्री समर्थ क्लिनिक' चालवून बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या ऋषीकेश रामचंद्र खोत (वय २८) या बोगस डॉक्टरला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत त्याला औषधे पुरवणारा एजंट ऋषीकेश संजय माने (वय २७, राहणार हुपरी) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोग्य विभागाने रचलेल्या जाळ्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला बनावट रुग्ण म्हणून पाठवण्यात आले होते. त्यावेळी संशयित आरोपीने गर्भपाताच्या औषधांसाठी ३ हजार रुपयांची मागणी केली आणि फोन करून एजंटकडून औषधे मागवून घेतली. औषधांचे पाकीट हातात येताच दबा धरून बसलेल्या पथकाने क्लिनिकवर छापा टाकला. या मोहिमेत क्लिनिकमधील सर्व औषधे आणि साहित्य जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील अभिवंत आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. जिल्हयातील अशा अवैध व्यवसायांवर पोलिसांची करडी नजर असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes