SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जैवविविधतेचा रक्षक: जागतिक जॅग्वार दिनसंजय घोडावत इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूल व ज्युनि कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ उत्साहातडिलिमिटेशनवरून महाविकास आघाडीत ठिणगी! पवारांच्या भूमिकेचे मुश्रीफांकडून स्वागत; वडेट्टीवार-राऊतांचा समाचार‘गोकुळ’च्या प्रगतीत प्राथमिक दूध संस्था कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा : चेअरमन राजेश पाटीलविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे : डॉ. अजितकुमार पाटीलनैतिक मूल्यांची रुजवणूक करणारी ‘दीनीयात ज्ञानस्पर्धा’ जिल्ह्यात उत्साहात; दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागसरोज पाटील यांना 'पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार' जाहीर; शनिवारी वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळाधैर्यशील भोसलेची जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी; ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटूचा मानभारतीय लोकशाही टिकविण्यासाठी संविधानिक मूल्यांचे जतन आवश्यक : प्रा. डॉ. प्रवीण पाटील‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर जि.प. सदस्या विनिता भोगम ॲक्शन मोडवर

जाहिरात

 

नवे दानवाडच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १९३ नागरिकांची तपासणी

schedule27 Nov 26 person by visibility 225 categoryउद्योग

◼️२३ जणांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया; आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या १८ हजार ३५२ वर

दानवाड : ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवे दानवाड येथे आयोजित आरोग्य शिबिरात एकूण १९३ नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये १२३ नागरिकांची नेत्र तपासणी, तर ७० नागरिकांची बीपी, शुगर व जनरल आरोग्य तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणीदरम्यान २३ जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे.

 ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच मोफत आरोग्य व नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध होत असल्याने या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या आरोग्य अभियानातील आजअखेर लाभार्थ्यांची संख्या १८ हजार ३५२ वर पोहोचली आहे.

नवे दानवाड येथे झालेल्या शिबिरावेळी रावसो कुंभोजे, शिवगोंडा पाटील, स्वाती कुन्नुरे, प्रकाश तीप्पणावर, चंद्रकांत कांबळे, शैलेंद्र रजपूत, महावीर पाटील, शिवाजी साळुंखे, कुणाल पाटील, बाळू अंबुपे, संजय परीट, आप्पासो बेरड, राजू पाटील, दीपक कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes