SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मंगळवारी आयोजनपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहणमहाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात महाडायलिसीस सेवांचा विस्तारजिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून शेंडा पार्क परिसराची पाहणीडी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा चित्रे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथमपुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे महाराष्ट्र दिनी वितरणप्रलंबित अत्याचार प्रकरणांचा वेळेत निपटारा करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडगोकुळ बाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच : भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलमहाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

जाहिरात

 

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मंगळवारी आयोजन

schedule29 Apr 26 person by visibility 91 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर, कोल्हापूर सेंटर आणि अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन,वाठार यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, 5 मे रोजी सकाळी 10 ते दु. 2 या वेळेत अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिटयुशन, वाठार ता.हातकणंगले  येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

  या रोजगार मेळाव्यामध्ये खासगी उद्योजकांकडून सुमारे 300 पेक्षा जास्त रिक्तपदे या रोजगार मेळाव्याकरिता कळविण्यात आलेली आहेत.  या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, बी.ई तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.  

  इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.i‍n आणि ncs.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदवावेत. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व ‍शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युमच्या 3 प्रती सोबत आणाव्यात.जास्तीत जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes