SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून शेंडा पार्क परिसराची पाहणीडी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा चित्रे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथमपुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे महाराष्ट्र दिनी वितरणप्रलंबित अत्याचार प्रकरणांचा वेळेत निपटारा करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडगोकुळ बाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच : भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलमहाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडगोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहितीनृत्य: मानवी भावनांचा लयबद्ध आविष्कारकृषी निविष्ठा विक्री व्यावसायिकांचा संप मागे

जाहिरात

 

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे महाराष्ट्र दिनी वितरण

schedule29 Apr 26 person by visibility 153 categoryराज्य

कोल्हापूर : सदविचार, धर्मनिष्ठा, त्याग, समर्पण, दुरदर्शी धोरण अशा सर्वगुणसंपन्न स्त्रियांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. या सर्वाभिमुख व्यक्तीमत्वाचा आदर्श जोपासून स्त्रियांनी पुढे यावे यासाठी महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या समाजसेविकांच्या व संस्थांच्या कामाची नोंद घेऊन त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जिल्हास्तरावर प्रदान करण्यात येतो. 

पुरस्कार प्राप्त समाजसेविका यांना महाराष्ट्र दिनी छत्रपती शाहू स्टेडीयम येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी दिली.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी सन 2020-21 साठी शोभादेवी पाटील,मु.पो.भादोले,सन 2021-22 साठी राजश्री  साकळे,कोल्हापूर, सन 2022-23 साठी वर्षा पाटील मु.पो.म्हाकवे व सन 2023-24 या वर्षासाठी आनंदा शिंदे, मु.पो.राशिवडे बु. यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी  10,001/- रुपये, स्मृतिचिन्ह,शाल सन्मानपत्र व श्रीफळ प्रदान करण्यात येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes