SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नव्या शाखेचे कोल्हापुरात थाटात उद्घाटनजागतिक बचत दिन: सुरक्षित आणि समृद्ध भविष्याची पायाभरणीसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कामगारांची दिवाळी गोड; १६.६६% बोनस जाहीर!घोडावत विद्यापीठात ‘स्टार बिझ बझार २०२६’चे उद्घाटनभाजपा जिल्हा कार्यालयात नूतन आमदार कौस्तुभ गावडे यांचा भव्य सत्कारदक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवडआमदार सतेज पाटील यांचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तरकोल्हापूर दूध संघ निवडणुकीवरून मंत्री हसन मुश्रीफांचा संताप; विरोधकांवर जोरदार हल्लाबोल!

जाहिरात

 

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

schedule29 Oct 26 person by visibility 244 categoryशैक्षणिक

◼️डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकाचा सन्मान  
◼️कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

कोल्हापूर : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ), कोल्हापूर येथील संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची दक्षिण कोरियाच्या प्रतिष्ठित ‘ब्रेन पूल फेलोशिप’ साठी निवड झाली आहे. यामुळे कोल्हापूर आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधन कार्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला आहे. डॉ. गुंजकर यांना यापूर्वी भारत सरकारची प्रतिष्ठित रामानुजन फेलोशिपही प्राप्त झाली आहे. 

डॉ. गुंजकर हे दक्षिण कोरियातील चुंग-अंग विद्यापीठाच्या फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागातील फूड बायोसेन्सर अँड थेरानोसिस प्रयोगशाळेत प्रा. जोंग पिल पार्क यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणार आहेत. ब्रेन पूल फेलोशिपमुळे अनुभवी संशोधकांना प्रगत संशोधन सुविधा, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि जागतिक संशोधन सहकार्याच्या संधी उपलब्ध होतात. यामुळे डॉ. गुंजकर यांना आंतरराष्ट्रीय अनुभव संपादन करून भारतीय संशोधन क्षेत्राच्या विकासासाठी योगदान देण्याची संधी मिळाली आहे.

डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी, अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च मधील डॉ. गुंजकर यांच्या संशोधनकार्याचा या निवडीत महत्त्वपूर्ण वाटा आहे. आंतरविद्याशाखीय संशोधन, संशोधन प्रकल्पांची उभारणी आणि प्रगत संशोधन सुविधांच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांच्या संशोधन प्रवासाला भक्कम आधार मिळाला. चुंग-अंग विद्यापीठासोबत संयुक्त संशोधन प्रकल्प, आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रांचे प्रकाशन, शास्त्रज्ञांची देवाणघेवाण, संयुक्त मार्गदर्शन, पेटंट आणि तंत्रज्ञान हस्तांतरण यांसारख्या क्षेत्रांत सहकार्य वाढविण्याची संधी या फेलोशिपमुळे उपलब्ध होऊ शकते. डॉ. गुंजकर यांच्या निवडीमुळे कोल्हापूरच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्राचा व विद्यापीठाचाही गौरव वाढला आहे.

या फेलोशिपमुळे मिळणारा आंतरराष्ट्रीय संशोधनाचा अनुभव कोल्हापूर आणि डी. वाय. पाटील संस्थेच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील विकासासाठी उपयोगात आणण्याचा प्रयत्न राहील. या फेलोशिपमुळे संयुक्त संशोधन, आंतरराष्ट्रीय प्रकाशने आणि विद्यार्थ्यांसाठी नव्या संशोधनसंधी निर्माण करण्यासाठी  प्रयत्नशील राहीन, अशी भावना डॉ. गुंजकर यांनी व्यक्त केली.

या निवडीबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील यांनी डॉ. गुंजकर यांचे अभिनंदन केले. 

🟣 कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचे पाठबळ
कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचे संशोधन कार्यासाठी नेहमीच प्रोत्साहन व पाठबळ लाभल्याचे डॉ. गुंजकर यांनी सांगितले.  तसेच विद्यापीठाचे नेतृत्व, पदाधिकारी आणि सहकाऱ्यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes