SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : मोफत केएमटी पास वितरण: केएमसी कॉलेजच्या प्र. प्राचार्यांकडून परिवहन विभागाची दिलगीर व्यक्त!राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्त

जाहिरात

 

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कामगारांची दिवाळी गोड; १६.६६% बोनस जाहीर!

schedule29 Oct 26 person by visibility 418 categoryउद्योग

बेलेवाडी काळम्मा : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कामगारांची यावर्षीची दिवाळी कारखाना प्रशासनाने गोड केली आहे. चालू वर्षात कामगारांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना १६.६६ टक्के बोनस देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे कामगार वर्गामध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे.
               
याबाबत अधिक माहिती अशी, कारखाना व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधी यांच्यात बोनस संदर्भात चर्चा झाली. अखेर सर्वांच्या संमतीने १६.६६% बोनसवर शिक्कामोर्तब करण्यात आले. हा बोनस दिवाळीपूर्वीच कामगारांच्या खात्यात जमा होणार असल्याने कामगारांची दिवाळी यंदा अधिक आनंदात साजरी होणार आहे.
              
कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी सांगितले की, कामगारांचे श्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळेच कारखान्याने हे यश संपादन केले आहे. हा बोनस म्हणजे त्यांच्या कष्टाचे फळ आहे. दुसरीकडे कामगार संघटनेच्यावतीने व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले आहे. कारखाना व्यवस्थापनाचा हा निर्णय कामगारांना अधिक प्रोत्साहन देणारा आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes