SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर दूध संघ निवडणुकीवरून मंत्री हसन मुश्रीफांचा संताप; विरोधकांवर जोरदार हल्लाबोल!'गोकुळ' : बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं!माणुसकीचा जिव्हाळा: आंतरराष्ट्रीय काळजी आणि समर्थन दिनइचलकरंजी: 'केन चेस सॉल्व्हिंग कप'मध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा डंका; ६ बालचमूंनी मारली बाजीसमकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी ६ नोव्हेंबर रोजी पेंशन अदालतपन्हाळा महसूल लोक अदालतीत ३० प्रकरणांमध्ये तडजोड; १४२ खातेदारांना लाभपुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचा झेंडा! कौस्तुभ गावडे यांचा मोठा विजय; कोल्हापुरात गुलाल उधळत जल्लोषकोजागिरीच्या चांदण्यात रंगली 'कलासक्त'ची सुरमई मैफील; समाजभूषण किशोर घाटगे यांचा महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते सत्कारतेरवाड येथील आरोग्य शिबिरात २४६ नागरिकांची तपासणी

जाहिरात

 

कोल्हापूर दूध संघ निवडणुकीवरून मंत्री हसन मुश्रीफांचा संताप; विरोधकांवर जोरदार हल्लाबोल!

schedule29 Oct 26 person by visibility 631 categoryराजकीय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर आणि सत्ता समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत बहुमत मिळालेले असतानाही, चेअरमन निवडीवरून आणि मॅंडेटवरून निर्माण झालेल्या वादावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी निवडणुकीतील घडामोडींवरून विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत.

या संपूर्ण वादावर प्रकाश टाकताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, गोकुळ दूध संघाच्या या निवडणुकीमध्ये मित्रपक्ष म्हणून सुरुवातीला आम्ही तीन पक्ष एकत्र होतो—भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट. परंतु, आमचे आणि भारतीय जनता पक्षाच्या त्या पक्षातील अनेक दिवस भांडण मिटले नाही. हे भांडण निवडणुकीपर्यंत न मिटल्यामुळे आमची एकजूट राहू शकली नाही, आणि त्यामुळेच थोडा पराभव झाला. या निवडणुकीमध्ये १३ आणि १२ अशा प्रकारे निवडून आले असून, आजच्या निवडणुकीमध्ये चेअरमन निवडण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, कारण बहुमत १३ चे असले तरी १४ चा कोरम पूर्ण होणे गरजेचे आहे. जोपर्यंत १४ चा कोरम पूर्ण होत नाही, तोपर्यंत नियमानुसार कोणतीही सभा होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना त्यांनी आपल्या वैयक्तिक दुःखाचा आणि पराभवाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, "मला याचे सर्वात मोठे दुःख हे आहे की माझा मुलगा या निवडणुकीमध्ये पराभूत झाला. वास्तविक पाहून माझी एक चूक झाली होती की मी त्याला जनरलमध्ये उभे करायला पाहिजे होते, पण त्याला कॅटॅगरीत उभे केले आणि त्याला टार्गेट करण्यात आले." विशेषतः जे पक्षाचे नेते म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करतात आणि धर्मनिरपेक्षतेचा आव आणतात, त्यांनीच निवडणुकीमध्ये जातीवादी प्रचार केला, हा माझा खरा आक्षेप असल्याचे मुश्रीफ यांनी आक्रमकपणे सांगितले.

मॅंडेटच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आकडेवारी समोर ठेवली की, आमची जी आघाडी होती ती छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी होती. एकूण २५ लोकांना मतदान करायचे होते आणि ५,३१४ मतदार होते. आमच्या आघाडीला २० मतदार जनरलमधून होते आणि त्यांना ५३,१४२ मते पडली. तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील ५ जणांना ११,९७२ मते पडली, असे मिळून आमच्या पॅनेलला एकूण ६५,११४ मते पडली. समविचारी आघाडीच्या जनरलच्या २० लोकांना ४८,६३० मते पडली आणि कॅटॅगरीच्या लोकांना १४,७०९ मते पडली, असे एकूण ६३,३३९ मते पडली. त्यामुळे मॅंडेट कुणाकडे आहे, हे मतांच्या द्वारे स्पष्ट झाले असेलच. हा मॅंडेट आमच्या बाजूनेच होता आणि तांत्रिकदृष्ट्या त्यांचे १३ सदस्य आले असले, तरी जसा १४ चा तांत्रिक कोरम अडचण ठरतो, तसाच तो त्यांच्यासाठीही आहे.

आता चेअरमन निवड कशी करायची आणि मार्ग कसा काढायचा, यावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वेळेला ज्यांनी नाव सुचवले होते, आणि ज्यांनी ती संस्था वाढवली ती आनंदराव चुयेकर यांचा मुलगा शशिकांत  चुयेकर यांना आमदार सतेज पाटील यांनी चेअरमन करणार असल्याचे सांगितले होते. हेच नाव गेल्या वेळेला आम्ही सुचवले होते, परंतु युतीचाच चेअरमन  झाला. आज ही शशिकांत चुयेकरांना  चेअरमन आज केले गेले नाही. दोनदा तसे झालेले आहे, त्यामुळे त्यांना चेअरमन करण्याची जबाबदारी विरोधकांना भविष्यात पार पाडावी लागेल, असा सूचक इशाराही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes