SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक वारशाचे रक्षक: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनशक्तीपीठ महामार्गाविरोधात सोमवारी सर्वपक्षीय एकवटणार, कसबा बावड्यात मेळावाकोल्हापूर : स्विमिंग पूलमध्ये बुडून दहावीतील विद्यार्थ्याचा अंतसार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस७००हून अधिक मंदिरे बांधणारे हसन मुश्रीफ जिहादी कसे?डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, तळसंदेच्या 132 विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवडवाढत्या महागाईच्या निषेधार्थ कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अभिनव 'विडंबनात्मक' आंदोलनआपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी डॉ .विजय राठोड बेळगावच्या राष्ट्रीय साहित्य संमेलनात कोल्हापूरचा डंका! ३ महिला कवयित्रींचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानजागतिक उच्च रक्तदाब दिन: शांत आव्हानाचा सामना करण्यासाठी जागरूकतेची गरज

जाहिरात

 

आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी डॉ .विजय राठोड

schedule17 May 26 person by visibility 218 categoryराज्य

कोल्हापूर :  जिल्ह्यात पडणाऱ्या पर्जन्यमानामुळे पुरस्थिती निर्माण होते .या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनान पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ .विजय राठोड यांनी दिली .                      राजाराम बंधारा येथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास यंत्रणा सज्ज असावी या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी साहित्य आणि प्रात्यक्षिकाची आज पाहणी केली.

   जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राजाराम बंधारा येथे देखभाल, दुरुस्ती, प्रात्यक्षिक व प्रशिक्षण या उद्देशाने तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

    प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणामध्ये सामील झालेल्या आपदा मित्र व आपदा सखींची आस्थापूर्वक चौकशी करून त्यांना आपत्कालीन स्थितीमध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच रेस्क्यू बोट,लाइफ जॅकेट,लाइफ रिंग,सॉकर कटर,हायड्रोलिक कटर,रेस्क्यू रोप,इमर्जन्सी फ्लोटींग लाईट्स आदींची प्रत्यक्ष पाहणी श्री राठोड यांनी यावेळी केली.

  याप्रसंगी करवीर तहसीलदार स्वप्निल पवार अग्निशमन दलाचे अधिकारी दस्तगीर मुल्ला , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह आपदा मित्र व सखी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes