SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात रेशन कार्डधारकांचा एल्गार; महागाई आणि रेशन कपातीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकअंजली पाटील यांना 'गीताव्रती' पदवीने गौरवजागतिक आरेखन दिन: सर्जनशीलतेचा उत्सवकोल्हापूर: भुदरगडमधील घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोरट्यास केली अटकआयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांची हॉकी स्टेडियम, गांधीनगर व कसबा बावडा येथील कामांची पाहणीजागतिक बौद्धिक संपदा दिननदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकुंभमेळा कामांना अधिक गती देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसबडोदा बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या कबनूरकर भावंडांचे यशआद्य शंकराचार्य जयंती उत्सव रविवारपासून; आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

जाहिरात

 

कोथळीतील अपघातग्रस्त कुटुंबाला जिल्हा बँकेकडून दोन लाखांचा विम्याचा धनादेश प्रदान

schedule25 Apr 26 person by visibility 260 categoryउद्योग

कोथळी : जयसिंगपूर–कोथळी मार्गावर दीड वर्षांपूर्वी झालेल्या मोटरसायकल अपघातात मृत्यू झालेल्या कोथळी विकास सेवा सोसायटीच्या कर्जदार सभासद सुदर्शन महावीर चुडाप्पा यांच्या वारसांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून दोन लाख रुपयांचा अपघात विम्याचा धनादेश प्रदान करण्यात आला. हा धनादेश आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सुदर्शन यांची बहीण  सुप्रिया व्हराटे यांना कोथळी सोसायटीच्या कार्यालयात देण्यात आला.

या प्रसंगी बोलताना सोसायटीचे चेअरमन धनगोंडा पाटील यांनी सांगितले की, सुदर्शन चुडाप्पा हे सोसायटीचे कर्जदार सभासद होते. त्यांच्या अपघाती निधनानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ‘जनता अपघात विमा’ योजनेअंतर्गत त्यांच्या कुटुंबीयांना ही आर्थिक मदत देण्यात येत आहे. या मदतीमुळे कुटुंबाला काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्
याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, गत आठवड्यात कोथळीतीलच तरुण शेतकरी भाऊसो गारे यांचाही अपघाती मृत्यू झाला आहे. गारे हे देखील सोसायटीचे कर्जदार सभासद असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही या विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हा बँकेकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले. संबंधित कुटुंबाला लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमास जिल्हा बँक जयसिंगपूर शाखेचे विभागीय अधिकारी बी. आर. पाटील, बँक निरीक्षक संतोष पाटील यांची उपस्थिती होती. तसेच कोथळी विकास सोसायटीच्या वतीने चेअरमन धनगोंडा पाटील यांच्या हस्ते आमदार यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सोसायटीचे संचालक दिलीप पाटील (एम.डी.), अशोक बोरगावे, पोपट पाटील, संजय खवाटे, भीमा कांबळे, शितल बोरगावे, जितेंद्र पाटील, सुरगोंडा हौंजे आदी उपस्थित होते.  स्वागत एस. टी. पाटील यांनी केले, प्रास्ताविक संजय नांदणे यांनी केले तर आभार सचिव कल्लाप्पा हिंगमिरे यांनी मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes