किशोर घाटगे यांना ‘इंटरनॅशनल शांती दूत समाजरत्न पुरस्कार २०२६’ जाहीर; ६ ऑक्टोबर रोजी दिल्लीत वितरण
schedule02 Oct 26 person by visibility 156 categoryसामाजिक
कोल्हापूर : श्री. स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते किशोर घाटगे यांना त्यांच्या ३५ वर्षांच्या निष्कलंक व व्यापक सामाजिक कार्याची दखल घेत अत्यंत प्रतिष्ठित ‘इंटरनॅशनल शांती दूत समाजरत्न पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे.
शांतिदूत परिवार, सर्किट बेंच फाउंडेशन, इंडियन पोलीस मित्र भारत आणि डॉ. सुरेश राठोड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
हा दिमाखदार सोहळा येत्या ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नवी दिल्लीतील महाराष्ट्र भवन येथे केंद्रीय मंत्री तसेच वरिष्ठ आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
▪️कार्याची ठळक वैशिष्ट्ये:
* जवानांसाठी उपक्रम: कारगिल युद्धापासून (१९९९) सतत सुरू असलेला ‘एक राखी सीमेवरील जवानांसाठी’ हा उपक्रम.
* लोकोपयोगी योजना: संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष असताना साडेचार हजारांहून अधिक विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना पेन्शन योजनांचा लाभ मिळवून दिला.
* जनहित आंदोलने: टोलविरोधी आंदोलन, खंडपीठ कृती समितीचे आंदोलन, रस्ते प्रश्न, तसेच पूरग्रस्त भागातील मदतकार्य आणि वैद्यकीय शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग.
राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेचा ३५ वर्षांचा वारसा जपत जनहितासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या किशोर घाटगे यांच्या या गौरवशाली यशाबद्दल कौतुक होत आहे.