SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभकिशोर घाटगे यांना ‘इंटरनॅशनल शांती दूत समाजरत्न पुरस्कार २०२६’ जाहीर; ६ ऑक्टोबर रोजी दिल्लीत वितरण महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विद्यापीठात अभिवादनशाश्वत अभियांत्रिकीच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवा : कुणाल जगदाळेमहात्मा गांधी जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने ‘स्वच्छता दिवस’ उत्साहात साजरामहात्मा गांधीजींचे विचारच नवतरुणांना प्रेरणा देत राहतील: डॉ. अजितकुमार पाटील - कसबा बावड्यात महात्मा गांधी जयंती व स्वच्छता दिन उत्साहात महापालिकेच्यावतीने माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री जयंती साजरी‘गाथा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची’ ग्रंथ भावी पिढ्यांच्या चारित्र्यनिर्मितीचा दीपस्तंभ : डॉ. माणिकराव साळुंखे यांचे प्रतिपादनसंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला ‘सीफोर स्कूल एक्सलन्स अवॉर्ड 2026' आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन: शांतता आणि मानवतेचा संदेश

जाहिरात

 

महात्मा गांधी जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने ‘स्वच्छता दिवस’ उत्साहात साजरा

schedule02 Oct 26 person by visibility 173 category

◼️वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम व पथनाट्याद्वारे जनजागृती

कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा–२०२६’ अभियानांतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने आज विविध ठिकाणी स्वच्छता, वृक्षारोपण व जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छता विषयी जागरूकता निर्माण करण्यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. नागरिकांनीही आपल्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले. प्लॅनेट कंपनीच्या माध्यमातून सायबर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पापाची तिकटी व भवानी मंडप परिसरात पथनाट्य सादर केले. या पथनाट्याद्वारे कचरा वर्गीकरण, सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण संवर्धन तसेच स्वच्छतेप्रती नागरिकांची जबाबदारी याबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली.  तसेच शाहू विद्यालय, न्यू पॅलेस येथील विद्यार्थी व शिक्षकांनी गांधी मैदान येथे स्वच्छता मोहीम राबविली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला.

या उपक्रमास महापालिकेचे उपायुक्त परितोष कंकाळ, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, शहर समन्वयक मेघराज चडचणकर, हेमंत काशीद, विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, आरोग्य निरीक्षक विनोद नाईक, भूमी कदम यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ‘स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes