SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावाडी .वाय. पाटील अभियांत्रिकीच्या प्रा प्रल्हाद गवळी यांना पीएच. डी.डीवायपी साळोखेनगरच्या विद्यार्थ्यांचे 'अभियंता करंडक' आणि 'वसंत करंडक' स्पर्धेत यशविनायक भोसले यांचा 'लायन्स गौरव' पुरस्काराने सन्मान गोकुळ दूधसंघाची निवडणूक ९० दिवसांत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशभारत सरकारच्या एनटीटीएम मिशन अंतर्गत डीकेटीईस १०.२१ कोटींचा प्रकल्प मंजुरछत्रपती शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादनआरक्षणाचे जनक आणि लोकराजा: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादनजागतिक आहारमुक्त दिवस: शरीर आणि मनाच्या आरोग्याचा उत्सवगोकुळची निवडणूक लांबणीवर टाकणे लोकशाहीसाठी घातक; आमदार सतेज पाटील यांची टीका

जाहिरात

 

डीवायपी साळोखेनगरच्या विद्यार्थ्यांचे 'अभियंता करंडक' आणि 'वसंत करंडक' स्पर्धेत यश

schedule06 May 26 person by visibility 111 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिरिंगच्या विद्यार्थ्यांनी कला आणि सांस्कृतिक स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले. भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर आयोजित 'अभियंता करंडक २०२६' आणि पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी, सांगली येथे आयोजित 'वसंत करंडक २०२६' सांस्कृतिक स्पर्धेमध्ये विविध विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश मिळवले.

'अभियंता करंडक' स्पर्धेमध्ये एकल नृत्यामध्ये तेजश्री कुलकर्णीला सर्वोत्कृष्ट नृत्य पारितोषिक मिळाले. चित्रकला प्रकारात आदित्य कांबळे अव्वल ठरला तर सृष्टी हर्डीकरला शास्त्रीय वादनात प्रथम क्रमांक मिळाला. स्पर्धेमध्ये सादर केलेल्या "फ्रेंडशिप" या राजेंद्र पोळ लिखित एकांकिकेला सर्वोत्कृष्ट लेखनाचे तर साक्षी कांबळे आणि शारदा शृंगारे या विद्यार्थिनींना सर्वोत्कृष्ठ अभिनयाचे पारितोषिक (विभागून) देण्यात आले. या स्पर्धेमध्ये डी. वाय. पाटील साळोखेनगरला वैयक्तिक पाच सर्वोत्कृष्ट पारितोषिकांसह सांघिक उपविजेतेपद  प्राप्त झाले.  समर्थ येणे , तेजश्री कुलकर्णी आणि शिवानी पवार यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम पहिले.

'वसंत करंडक' स्पर्धेत एकपात्री अभिनय प्रकारात साक्षी कांबळे प्रथम आणि म्युझिक बँड सादरीकरणात श्रावणी महिंद, सृष्टी जाधव, सायली कर्णिक, अगम काळे, प्रथमेश पोयेकर, वैष्णव पिळगांवकर, ऋषीराज देसाई, श्रेयश राखुंडे यांच्या संघाने प्रथम क्रमांक तर सांघिक नृत्य प्रकारात मल्हार ढवळे, अरमान नदाफ, श्रेयश राखुंडे, वैष्णव पिळगांवकर, करण कोळेकर, ऋषिकेश शिंदे, यशोदीप देवकर, समर्थ येणे संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच या स्पर्धेमध्ये एकल नृत्य प्रकारात अर्णवी मालंडकर तृतीय, छायाचित्रणामध्ये  राजवर्धन रावण द्वितीय, एकल सुगम गायन श्रावणी महिंद तृतीय क्रमांक आणि लघुनाटिका सादरीकरण प्रकारात संघाने द्वितीय क्रमांक मिळवत संघाने स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेसाठी रिया कडव आणि समर्थ येणे यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम पहिले.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील आणि देवश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कॅम्पस डायरेक्टर डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने , प्रशासकीय अधिकारी प्रा. सुयोग पाटील, डीन स्टुडन्ट वेल्फेअर  प्रा. गौरव देसाई आणि सांस्कृतिक विभागाचे प्राध्यापक समन्वयक प्रा. अनिकेत प्रभावळीकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes