SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विनायक भोसले यांचा 'लायन्स गौरव' पुरस्काराने सन्मान गोकुळ दूधसंघाची निवडणूक ९० दिवसांत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशभारत सरकारच्या एनटीटीएम मिशन अंतर्गत डीकेटीईस १०.२१ कोटींचा प्रकल्प मंजुरछत्रपती शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादनआरक्षणाचे जनक आणि लोकराजा: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादनजागतिक आहारमुक्त दिवस: शरीर आणि मनाच्या आरोग्याचा उत्सवगोकुळची निवडणूक लांबणीवर टाकणे लोकशाहीसाठी घातक; आमदार सतेज पाटील यांची टीकाजीवन प्राधिकरणावर गुरुवारी घागर मोर्चा; १३ गावांचा पाण्यासाठी एल्गारआमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावप्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य : शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर

जाहिरात

 

गोकुळ दूधसंघाची निवडणूक ९० दिवसांत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

schedule06 May 26 person by visibility 151 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात  'गोकुळ' दूधसंघाच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, लोकशाही प्रक्रियेत वेळेवर निवडणुका होणे गरजेचे असून, येत्या ९० दिवसांच्या आत गोकुळची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. या निकालामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राजकीय संघर्षाला आता नवी दिशा मिळाली आहे.

दरम्यान, दूधसंघावर प्रशासक नियुक्त करण्याबाबतच्या वादावर न्यायालयाने तूर्तास कोणताही अंतिम निर्णय न देता, याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रशासक राहणार की जुन्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार, हे आता हायकोर्टाच्या निकालावर अवलंबून असेल.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटांकडून आता निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes