SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आयटीआयमधून प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात उद्यमनगरीचा पाया रचणार्‍या म्हादबा मिस्त्री यांचा आदर्श ठेवावा, खासदार धनंजय महाडिक यांचं आवाहनडी.वाय.पाटील मेडीकल कॉलेजला विजेतेपदकामे न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा : आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांचे निर्देशप्राथमिक शिक्षण समितीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीस प्राधान्य द्या, शाळांच्या भौतिक सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील : आमदार राजेश क्षीरसागरडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला कला, छायाचित्रणातून पन्हाळगडाचा इतिहासगांधीनगरच्या विषयावर सभा तहकूब? 'त्या' चर्चांना महापौरांचा पूर्णविराम; १ तारखेला पुन्हा महासभाकोल्हापूर जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत बंदी आदेश लागूतावडे हॉटेल प्रकरणात स्क्रिप्ट कोणाची?, सत्ताधारी-विरोधकांची मिलीभगत असल्याचा 'आप'चा आरोप निसर्गातील गणिताचा अद्भुत चमत्कार: फिबोनाची दिनसमान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी नागरिकांना मते मांडण्याची संधी; संबंधित गट,संस्था व नागरिकांनी सहभागी व्हावे : शीतल तेली - उगले

जाहिरात

 

डी.वाय.पाटील मेडीकल कॉलेजला विजेतेपद

schedule23 Nov 26 person by visibility 124 categoryक्रीडा

◼️डी. वाय. पाटील विद्यापीठ आंतरमहाविद्यालय व्हॉलीबॉल स्पर्धा

कोल्हापूर : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठांतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयी.   व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष व महिला या दोन्ही गटात डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज संघानी विजेतेपद मिळवले. 

डी वाय पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कदमवाडी येथे  झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. राजेश खाय्लाप्पा यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक (विद्यार्थी कल्याण) डॉ. अद्वैत राठोड, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, प्रा. सागर जानराव, ऋषिकेश कुंभार, डॉ. सोनिया लोहाना, रोहन वाडकर, सुशांत कायपुरे वैष्णवी कौलगे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरुष गटात मेडिकल, फिजिओथेरपी, फार्मसी, नर्सिंग, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग आणि हॉस्पिटलिटी या ६ संघांनी, तर महिला गटात ५ संघांनी सहभाग घेतला. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुरुष गटात डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज संघाने डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी संघावर विजय मिळवला. तर महिला गटात डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज संघाने डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फ़िजिओथेरपी संघावर मात करत विजेतेपद मिळवले. 

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी विजेत्या संघांचे आणि खेळाडूंचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes