SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत बंदी आदेश लागूतावडे हॉटेल प्रकरणात स्क्रिप्ट कोणाची?, सत्ताधारी-विरोधकांची मिलीभगत असल्याचा 'आप'चा आरोप निसर्गातील गणिताचा अद्भुत चमत्कार: फिबोनाची दिनसमान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी नागरिकांना मते मांडण्याची संधी; संबंधित गट,संस्था व नागरिकांनी सहभागी व्हावे : शीतल तेली - उगलेराज्यातील जनतेला आरोग्य विषयक सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी कटिबद्ध : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरहरोली, धरणगुत्ती, नांदणी आणि जांभळी गावात ५३६ जणांना मोफत चष्म्यांचे वाटप; ५३ जणांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रियाउंचगावमध्ये गड-किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात"दहा वर्षांत पक्षात आलेल्यांना पदे, मग ४० वर्षांच्या निष्ठेचं काय?" : आमदार राजेश क्षीरसागर यांचा सवालयेणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमदार शिवाभाऊंना ठाण्यामध्ये शोधावे लागेलधरणगुत्ती, हरोली गावच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

जाहिरात

 

तावडे हॉटेल प्रकरणात स्क्रिप्ट कोणाची?, सत्ताधारी-विरोधकांची मिलीभगत असल्याचा 'आप'चा आरोप

schedule23 Nov 26 person by visibility 128 categoryसामाजिक

कोल्हापूर  : तावडे हॉटेल परिसरातील 204 बांधकामे  कोल्हापूर शहराच्या हद्दीत येत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. तब्बल 158 एकर जागेत विस्तारलेली ही बांधकामांनी महापालिकेने आरक्षित केलेल्या 35 एकर भूखंड काबीज केला आहे. यामध्ये ट्रक टर्मीनल साठी आरक्षित 13 एकर, तर कचरा डेपो साठी 22 एकर जागा आरक्षित आहे. तसेच उर्वरित जागेतील बहुतांश बांधकामे ब्ल्यू लाईन मध्ये येत असून त्या जागेत बांधकामे करण्यास मनाई आहे. 

सामान्यांच्या अतिक्रमणावर हातोडा चालवण्यास तत्पर असलेले महापालिका प्रशासन मात्र या प्रकरणात कासवाच्या गतीने पुढे गेले. त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन खुद्द विरोधी बाकावरील एका 'सेवका'ने जनरल बॉडीत उपसूचना मांडल्याने या प्रकरणात आता विरोधकांनी सुद्धा बाजू लावून धरण्याचे ठरवले असल्याचे स्पष्ट झाले.

मागील सर्वसाधारण सभेत 'आम्हाला निधी मिळत नाही' असा कांगावा करत चक्क विरोधकांच्या सोबत सत्ताधाऱ्यांनी देखील सभात्याग केला. सर्वांना निधी पोहचून कामे मार्गी लागत असल्याची स्पष्टोक्ती आयुक्तांच्या पाठोपाठ दस्तरखुद्द महापौरांनी दिली. त्या सभेत या बांधकामांचा मुद्दा विषय पत्रिकेत होता. केवळ 'डील' फायनल करू पर्यंत वेळ मारून न्यावा यासाठीच ही स्क्रिप्ट लिहली गेल्याचा आरोप आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला.

उच्च न्यायालयाने 2018 साली जैसे-थे चे आदेश दिले होते. परंतु त्यानंतरही बांधकामे थांबली नाहीत. अशांचा देखील बचाव करण्यासाठी आता सभागृह एकवटले आहे. या 204 मिळकतींना संरक्षण मिळावे यासाठी शंभर कोटींची 'डील' फायनल करण्यात आली आहे अशी शहरभर चर्चा आहे. 'शंभर खोके आणि 89 बोके' असे म्हणवून घेण्यास 'सेवकांनी' तयार होऊ नये. याबाबतीत शहराला प्राधान्य देऊन आपल्या नेत्यांना स्पष्ट सांगावे असे आवाहन आप ने केले आहे. 

एकीकडे शहरातील सर्वसामान्य फेरीवाल्यांना त्रास दिला जात असताना शहर फेरीवाला समितीचे गॅजेट न करता त्यांना राष्ट्रीय फेरीवाला धोरणाद्वारे दिलेल्या कायदेशीर संरक्षणापासून गेली दोन वर्षे वंचित ठेवणारे हे कारभारी, लक्ष्मीदर्शन होणार म्हटल्यावर सभागृह त्यागाचा बनाव रचत आहेत. धनदांडग्यांच्या अवैध कृतीचा बचाव करणारे हे लोकप्रतिनिधी हातावरचे पोट असणाऱ्यांसाठी का पुढे येत नाहीत असा सवाल आप ने केला. 
 
यावेळी आप चे शहराध्यक्ष उत्तम पाटील, महासचिव अभिजित कांबळे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष मोईन मोकाशी, सूरज सुर्वे, विजय हेगडे, संजय नलवडे, अमरसिंह दळवी, उमेश वडर, शशांक लोखंडे, महंमदशरीफ काझी आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes