SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आयटीआयमधून प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात उद्यमनगरीचा पाया रचणार्‍या म्हादबा मिस्त्री यांचा आदर्श ठेवावा, खासदार धनंजय महाडिक यांचं आवाहनडी.वाय.पाटील मेडीकल कॉलेजला विजेतेपदकामे न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा : आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांचे निर्देशप्राथमिक शिक्षण समितीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीस प्राधान्य द्या, शाळांच्या भौतिक सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील : आमदार राजेश क्षीरसागरडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला कला, छायाचित्रणातून पन्हाळगडाचा इतिहासगांधीनगरच्या विषयावर सभा तहकूब? 'त्या' चर्चांना महापौरांचा पूर्णविराम; १ तारखेला पुन्हा महासभाकोल्हापूर जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत बंदी आदेश लागूतावडे हॉटेल प्रकरणात स्क्रिप्ट कोणाची?, सत्ताधारी-विरोधकांची मिलीभगत असल्याचा 'आप'चा आरोप निसर्गातील गणिताचा अद्भुत चमत्कार: फिबोनाची दिनसमान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी नागरिकांना मते मांडण्याची संधी; संबंधित गट,संस्था व नागरिकांनी सहभागी व्हावे : शीतल तेली - उगले

जाहिरात

 

गांधीनगरच्या विषयावर सभा तहकूब? 'त्या' चर्चांना महापौरांचा पूर्णविराम; १ तारखेला पुन्हा महासभा

schedule23 Nov 26 person by visibility 155 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची महासभा गांधीनगरच्या वादग्रस्त विषयावरून तहकूब झाल्याच्या जोरदार चर्चांना अखेर महापौर रूपाराणी निकम यांनी पूर्णविराम दिला आहे. सभा केवळ शहरातील प्रलंबित प्रश्नांमुळे तहकूब करण्यात आली असून, येत्या १ तारखेला सकाळी ११ ते ११:३० दरम्यान सभागृहात पुन्हा महासभा घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

◼️नेमके काय म्हणाले महापौर?
 * न्यायालयीन कालमर्यादा: गांधीनगरचा विषय हा न्यायप्रविष्ट आणि प्रशासकीय स्तरावरून आलेला असल्याने त्यावर महिन्याभरात निर्णय घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे येणाऱ्या सभागृहात हा विषय निश्चितच पटलावर घेतला जाईल.
 * कायदेशीर चौकटीतच कामकाज: संबंधित जागेवर कचरा डेपो किंवा ट्रक पार्किंगचे आरक्षण आहे. यावरून न्यायालयात जाण्याचे इशारे दिले जात असले, तरी महापौर म्हणून आपले कामकाज नेहमीच कायदेशीर चौकटीत राहील आणि कोणत्याही बेकायदेशीर ठरावाला परवानगी दिली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.
 * आर्थिक उलाढालीचे आरोप फेटाळले: या प्रकरणात कोट्यवधींची उलाढाल, तिप्पट दर आणि नेते-नगरसेवकांच्या सहभागाबाबत शहरात सुरू असलेल्या चर्चा पूर्णपणे तथ्यहीन व निराधार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
येत्या १ तारखेला होणाऱ्या महासभेत या सर्व मुद्द्यांवर सविस्तर खुलासा होऊन चित्र स्पष्ट होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes