SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीत‘फ्युचर रेडी इंजिनिअर्स प्रोग्राम २०२६–२७’चे उद्घाटनवारणा उद्योग समूहाकडून शेतकरी, कामगारांची दिवाळी गोड; दिवाळी सणानिमित्त सुमारे १२५ कोटी रुपयांचे वितरणकोल्हापूर महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याची विशेष मोहीमविनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी शहरातील 11 आस्थापने सीलकोल्हापूर : अनधिकृत फटाका विक्री केल्यास २ हजार रुपये दंड; फटाका स्टॉलसाठी निश्चित केलेल्या जागेवरच विक्रीस परवानगीगांधीनगर बाजारपेठेत दिवाळीत भारनियमन नको; करवीर शिवसेनेचा महावितरणला इशारा‘केआयटी’त सायबर सुरक्षा विषयात विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे धडे‘गोकुळ’ची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विक्रमी २१ लाख ७० हजार लिटर दूध विक्री!शिरढोण येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणीजागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिन: महत्त्व आणि जतनाची गरज

जाहिरात

 

'वोट बचाओ देश बचाओ' अभियान: लोकशाही धोक्यात आणणाऱ्या एसआयआर प्रक्रियेविरोधात काँग्रेसचा देशव्यापी एल्गार

schedule25 Oct 26 person by visibility 247 categoryराजकीय

कोल्हापूर : एसआयआर (SIR) प्रक्रियेच्या नावाखाली सत्ताधारी भाजप सरकार देशातील दलित, आदिवासी, मागासवर्गीय तसेच विचारधारेने विरोधी असणाऱ्या मतदारांची नावे मतदारयादीतून पद्धतशीरपणे वगळत असल्याचा गंभीर आरोप राजस्थानचे माजी मंत्री दिनेश खोडानिया यांनी केला आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हा अत्यंत धोक्याचा इशारा असून, या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशभरात 'वोट बचाओ देश बचाओ' हे देशव्यापी अभियान हाती घेतले असल्याची माहिती त्यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत दिली.

घरोघरी जाऊन जनजागृती आणि मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याची मोहीम
या देशव्यापी अभियानाअंतर्गत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संपूर्ण देशभरात घरोघरी जाऊन मतदारयादीतून नाव कमी झालेल्या मतदारांची माहिती गोळा करणार आहेत. ज्या मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेली आहेत, त्यांची नावे पुन्हा मतदारयादीत कशी बसवता येतील, यासाठी जनतेमध्ये जनजागृती केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशातील लोकशाही कमकुवत करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असल्याचा घणाघात खोडानिया यांनी यावेळी केला.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा लढा सुरूच राहणार
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा लढा असाच तीव्र सुरू राहणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. निवडणूक आयुक्तांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, ईव्हीएम (EVM) मशीनवरील मतदान प्रक्रिया बंद करून सर्व निवडणुका बलेट पेपरवरच घेण्यात याव्यात आणि चुकीच्या पद्धतीची एसआयआर प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसचा हा लढा देशभरात अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा दिनेश खोडानिया यांनी दिला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes