SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिका : गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर रुपाराणी निकम यांचा उपक्रमराज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफडॉग शेल्टर, पथदिवे व जनरल बजेटमधील विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णयबिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक परिसरात महापालिकेची धडक अतिक्रमण कारवाईॲपद्वारे खत खरेदीची सक्ती रद्द करावी; आमदार सतेज पाटील यांची मागणी..चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनजयसिंगपूर नगरपरिषद सर्वसाधारण सभेसमोरील विषयांना बहुमताने मंजुरीनाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजनराज ठाकरे व बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे वाहतूक सेनेतर्फे शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप होणार शिरोली एमआयडीसीत अवैध्य गॅस विक्रीचा पर्दाफाश: ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी विविध विभागांचा घेतला आढावा

schedule08 Jun 26 person by visibility 294 categoryमहानगरपालिका

  ▪️वसुली, स्वच्छता, पाणीपुरवठा व विकासकामांना गती दया - आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

  कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात आज सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, वसुली, अतिक्रमण निर्मूलन, शिक्षण, उद्याने तसेच विविध विकासकामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

  या बैठकीत आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी कचरा उठाव व पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवांसाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. लाडपागे वारस यांच्या सर्व नियुक्त्या तातडीने पूर्ण कराव्यात, तसेच जयंती नाल्याच्या काठावरील साचलेला गाळ पुढील दोन दिवसांत हटविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी चारही विभागीय कार्यालयांना स्वतंत्र अतिक्रमण निर्मूलन वाहने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरफाळा, पाणीपुरवठा, परवाना व आरोग्य विभागांचा स्वतंत्र साप्ताहिक आढावा घ्यावा. तसेच अतिक्रमण कारवाई, साईट व्हिजिट, विविध प्रकरणांचा निपटारा विभागीय कार्यालय स्तरावरच प्रभावीपणे करण्याचे निर्देश यावेळी दिले.

  महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी घरफाळ्याच्या मोठ्या थकबाकीदारांवर बोजा नोंदविणे व आवश्यकतेनुसार मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. पाणीपुरवठा विभागाने जुन्या जलवाहिन्या बंद करून नव्या जलवाहिन्या टप्प्याटप्प्याने सुरू कराव्यात तसेच थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करण्याची मोहीम राबवावी असे सांगण्यात आले. ग्रामपंचायतींकडील थकबाकी वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर सरपंच व ग्रामसेवकांची बैठक घेऊन पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले. बंद पाणी मीटरधारकांवरील दंडात्मक कारवाईसाठी नव्या धोरणाचा प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले. मोठ्या अपार्टमेंटमधील फ्लॅटच्या संख्येनुसार हा दंड आकारण्याची तरतूद करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.

  ‘उल्लू’ संस्थेमार्फत शहरात आणखी चार सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असून त्यासाठी विभागीय कार्यालयांनी प्रत्येकी एक जागा निश्चित करावी. उद्यानांमध्येही अशा सुविधा उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याच्या सूचना उद्यान विभागाला देण्यात आल्या. आमदार अमल महाडीक यांनी उपलब्ध करून दिलेले एलईडी दिवे पुढील दोन दिवसांत बसवून घ्यावेत तसेच उर्वरित दोन हजार दिवे उपलब्ध करुन घेऊन पुढील 15 दिवसांत बसविण्याचे निर्देश दिले. ईएसएसएल कंपनीविरोधातील ब्लॅकलिस्ट व करार समाप्तीची कार्यवाही पूर्ण करून त्याची माहिती शासन व संबंधित कंपनीला कळविण्याचेही आदेश देण्यात आले. नगररचना विभागाने आरक्षणाच्या जागांची यादी विभागीय कार्यालये व इस्टेट विभागास उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्या जागांचा विकास करून उत्पन्नवाढविता येईल असे सांगितले. शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील याची दक्षता घेण्याबरोबरच सर्व शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरुस्ती व इतर आवश्यक सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. महापालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची देयके प्रलंबित ठेवू नयेत व सर्व देयकांचा तातडीने पुर्तता करावी असे निर्देश दिले. हलसवडे येथील 25 एकर जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. व्हीनस कॉर्नर येथील गाडी अड्डा परिसरातील कामे तातडीने पूर्ण करून तेथे पार्किंग सुविधा सुरू करावी. तसेच संबंधित निविदाधारकास चार्जिंग स्टेशन उभारण्याची अट निविदेमध्ये समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले. महापालिकेकडील सर्व भंगार साहित्याचा एकत्रित लिलाव करून त्यानंतर दर सहा महिन्यांनी नियमित लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले.

  शहरात उभारण्यात येणाऱ्या मोठ्या झुल्यांना व खेळण्यांच्या स्टॉलना महापालिकेची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्याचे आदेश देण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी चार स्वतंत्र बूम यंत्रे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेण्यास सांगण्यात आले. पाणी साचणाऱ्या ठिकाणी मेनहोल उघडून पाण्याचा निचरा करावा, आवश्यक असल्यास गटारावरील स्लॅब कापून तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या.

  यावेळी अतिरिक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ.विजय पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्री, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, कामगार अधिकारी राम काटकर, रवका अधिकारी प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, सहा.विद्युत अभियंता नारायण पुजारी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कनिष्ठ अभियंता पदमल पाटील उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes