SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उदगाव ग्रामीण रुग्णालयात २६ पदसंख्या भरतीला मंजुरी : आमदार यड्रावकरसीपीआर नूतनीकरण वास्तूचे जुलैच्या पहिल्या आठवडयात मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन : मंत्री हसन मुश्रीफविनापरवाना क्लासेसविरोधात महापालिकेची संयुक्त कारवाई ; अनअकॅडमी क्लासेस सीलगांधी मैदान परिसरातील 4 हातगाडया व चिंदी विक्रेत्यांची 124 गाठोडी जप्त28 जून रोजी कोल्हापुरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम कोल्हापूर शिवसेनेत मोठा भूकंप: जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचा तडकाफडकी राजीनामा!पालघर अपघात : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरिततात्काळ आपत्तीजन्य इशारे प्रसारित होण्यासाठी राज्य शासनाची अर्ली वॉर्निंग सिस्टम अधिक सक्षमगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करणार : जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलजागतिक नाविक दिन: जागतिक अर्थव्यवस्थेचे अनमोल शिल्पकार

जाहिरात

 

सीपीआर नूतनीकरण वास्तूचे जुलैच्या पहिल्या आठवडयात मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन : मंत्री हसन मुश्रीफ

schedule25 Jun 26 person by visibility 89 categoryआरोग्य

  कोल्हापूर : छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय या नुतणीकरण वास्तूचे लोकार्पण पावसाळी अधिवेशन समाप्तीनंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख मिळाल्यानंतर कदाचित जुलैच्या पहिल्या आठवडयात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

  शेंडा पार्क येथील छोटेखानी सभागृहात आज मंत्री हसन मुश्रीफ यांनी तेथे सुरू असलेल्या विविध विभागातील सोई सुविधांचा आढावा घेतला. याप्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे,माजी अधिष्ठाता डॉ.अजित लोकरे, सीपीआरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.भूषण मिरजे, डॉ.गिरीश कांबळे,वैद्यकीय महाविद्यालय अधिक्षक डॉ.शिशिर मिरगुंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

  यावेळी श्री मुश्रीफ यांनी शेंडा पार्क येथे सुरू असलेले 125 निवासी स्त्री/पुरुष डॉक्टरांचे निवासी वसतीगृह,प्रत्येकी 150 मुला/मुलींचे वसतीगृह,बॅडमिंटन व टेबल टेनिस कोर्ट, विश्रामगृह नूतनीकरण त्याचबरोबर MBBS चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जुन्या वसतिगृहाचे नूतनीकरण तसेच 150 नर्सिंग क्षमता असलेल्या हॉस्टेल व प्रशिक्षण केंद्राचा आढावा घेऊन उर्वरीत कामे येत्या वर्षाअखेर पर्यंत पूर्ण करावीत.त्याचबरोबर सध्या या ठिकाणी सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये पाणी,रस्ता ,वीज त्याचबरोबर एसटीपीची (सिव्हेज ट्रिटमेंट प्लॅन्ट) कामे प्राधान्य करण्यात यावीत असे निर्देश दिले.शेंडा पार्क येथील कामकाजासह श्री मुश्रीफ यांनी सीपीआर येथील अपूर्ण कामांचाही आढावा घेतला .

  यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री बुरुड,डॉ.अनिता सैबनवार, प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप,मनपा जल अभियंता हर्षदीप घाटगे,कार्य अभियंता क्रांतीकुमार मिरजकर कार्यालयीन अधिक्षक समीर मोमीन यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी - कंत्राटदार उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes