SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठात लवकरच ‘एमबीए ग्लोबल’ अभ्यासक्रमकोरे अभियांत्रिकीचे प्रा. अनिकेत तोडकर यांना पी.एच.डी. पदवी प्रदानशिवजयंती दिनी 'मेरा युवा भारत' मेगा पदयात्रेचे आयोजनव्हिनस कॉर्नर मार्केट व छ.शिवाजी मार्केट मधील थकबाकी असलेले पाच दुकानगाळे इस्टेट विभागामार्फत सीलकेंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादनावर भर द्यावा भीमा कृषी प्रदर्शनात खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांची कोल्हापूर महापालिकेला अभ्यास भेटमहात्मा बसवेश्वर पुरस्कारासाठी 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनएम .एड व बी .एड –एम .एड (एकात्मिक ) साठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२६बी.एस्सी.बी .एड् ((ITEP) साठी नॅशनल कॉमन एट्रन्स टेस्ट (NCTE) अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२६डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

जाहिरात

 

डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

schedule13 Feb 26 person by visibility 77 categoryशैक्षणिक

 🔹️देशपातळीवरील अभियांत्रिकी स्पर्धेत पॉप्युलर चॉईस अवॉर्ड पुरस्काराने सन्मान

  इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील चार विद्यार्थ्यांनी बंगळुरू येथे ‘इमटेक्स-२०२६’ या जागतिक स्तरावरील अत्याधुनिक मशिनरी टूल्सच्या प्रदर्शनात संपन्न झालेल्या प्रकल्प स्पर्धेमध्ये 'पॉप्युलर चॉईस अवॉर्ड' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बंगळुरू येथे पार पडलेल्या या प्रदर्शनात डीकेटीईतील मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये शिकणाऱ्या अनुज लुगडे, हर्षवर्धन हरगुडे, सोहम बिरनाळे व शरवील लोखंडे या विद्यार्थ्यांनी प्रा. सुयोग रायजाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या 'एक्झॉस्ट टू प्रिंटर इंक कन्व्हर्टर विथ स्मार्ट पीयुसी किट' या पेटंटप्राप्त नावीन्यपूर्ण प्रकल्पाला प्रतिष्ठेचा पॉप्युलर चॉईस अवॉर्ड प्रदान करण्यात आला. सदर प्रकल्प डीकेटीईच्या आयडिया लॅबमध्ये विकसित केला आहे.

  ‘इंडियन मशिन टूल्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (इमटेक्स) यांच्या विद्यमाने जागतिक स्तरावरील अत्याधुनिक मशिनरी टूल्सचे प्रदर्शन बंगळुरू येथे भरवण्यात आले होते. जगभरातील सुमारे एक हजारहून अधिक अत्याधुनिक ऑटोमॅटिक मशिनरी मॅन्युफॅक्चरर नामांकित कंपन्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत देशभरातील ४० हून अधिक अभियांत्रिकी कॉलेजांमधील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असताना, विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आणि संशोधनातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

  डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पामध्ये वाहनांच्या धुरांतून बाहेर पडणारे हानिकारक कार्बन कण विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने गोळा करून त्यावर प्रक्रिया केली आणि त्याचे प्रिंटर शाईमध्ये रूपांतर केले. पर्यावरण संरक्षणाचा विचार करून तयार करण्यात आलेले हे तंत्रज्ञान भविष्यात प्रदूषण कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. स्मार्ट पीयुसी प्रणालीमुळे वाहनातून होणारे प्रदूषण तात्काळ डॅशबोर्डवर दिसून येते. ही प्रणाली आरटीओशी ऑनलाइन जोडली असल्यामुळे पीयुसी तपासणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि सोपी होण्यास मदत होणार आहे. तसेच कारखाने व औद्योगिक क्षेत्रातही धूर व उत्सर्जन नियंत्रणासाठी आणि यंत्रसामग्रीच्या देखभालीबाबत वेळेवर सूचना मिळवण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरेल, अशा दृष्टीने याचा प्रभावी वापर करता येईल. प्रत्येक फेरीमध्ये विचारल्या जाणाऱ्या तांत्रिक प्रश्नांना डीकेटीईचे विद्यार्थी गुणवत्ता सिद्ध करीत होते. यामध्ये बौद्धिक, तांत्रिक, अत्याधुनिक तंत्रज्ञान, जनरल नॉलेज व मूल्यांकन या सर्व स्तरांवर डीकेटीईचे विद्यार्थी पात्र ठरल्यामुळे त्यांना पॉप्युलर चॉईस अवॉर्डने गौरविण्यात आले.

  संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे,कार्यकारी संचालक रवी आवाडे, डायरेक्टर डॉ एल.एस. आडमुठे मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा.डॉ.व्ही.आर. नाईक यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes