SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठात लवकरच ‘एमबीए ग्लोबल’ अभ्यासक्रमकोरे अभियांत्रिकीचे प्रा. अनिकेत तोडकर यांना पी.एच.डी. पदवी प्रदानशिवजयंती दिनी 'मेरा युवा भारत' मेगा पदयात्रेचे आयोजनव्हिनस कॉर्नर मार्केट व छ.शिवाजी मार्केट मधील थकबाकी असलेले पाच दुकानगाळे इस्टेट विभागामार्फत सीलकेंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादनावर भर द्यावा भीमा कृषी प्रदर्शनात खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांची कोल्हापूर महापालिकेला अभ्यास भेटमहात्मा बसवेश्वर पुरस्कारासाठी 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनएम .एड व बी .एड –एम .एड (एकात्मिक ) साठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२६बी.एस्सी.बी .एड् ((ITEP) साठी नॅशनल कॉमन एट्रन्स टेस्ट (NCTE) अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२६डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीचे प्रा. अनिकेत तोडकर यांना पी.एच.डी. पदवी प्रदान

schedule13 Feb 26 person by visibility 83 categoryराज्य

वारणानगर :  वारणा विद्यापीठ अंतर्गत अग्रणी संस्था तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त) महाविद्यालयातील अप्लाईड सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज  विभागातील प्राध्यापक अनिकेत सर्जेराव तोडकर यांना सरदार वल्लभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सुरत कडून  मॅथेमॅटिक्स या विषयात पी.एच.डी. पदवी प्रदान झाली आहे.

त्यांनी "सम वेरीएंट्स ऑफ मल्टी ऑब्जेक्टिव्ह शॉर्टेस्ट पाथ प्रॉब्लेम्स अंडर अनसर्टन  एन्व्हायरमेंट विथ एक्स्पिरेशन लेव्हल बेस्ड एनएसजीए   टू अँड थ्री" या विषयावर  संशोधनपर प्रबंध सादर केला. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील जर्नल मध्ये शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत. 

संशोधनासाठी डॉ. जयेश दोडिया, सरदार वल्लभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सुरत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन . एच. पाटील, कुलगुरू, डॉ. डी. टी. शिर्के व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

आपल्या संशोधनाचा उपयोग समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी करावा असा सल्ला डॉ. विनय कोरे यांनी दिला. अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने व विभागप्रमुख डॉ. पी. जे. पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes