‘डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनींची नेदरलँडमधील सॅक्सॉन युनिव्हर्सिटीत दैदिप्यमान कामगिरी’
schedule30 Apr 26 person by visibility 106 categoryराज्य
इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या तृतीय वर्ष टेक्स्टाईल फॅशन टेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थींनी शर्मोली अमोल गाताडे व सानिका सागर कोईक यांनी नेदरलँड येथील सॅक्सॉन युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस, येथे उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी नोंदवत आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविला आहे. क्रेडिट ट्रान्सफर स्कीम अंतर्गत त्यांची एका सेमिस्टरसाठी निवड झाली आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधनाधारित शिक्षणपध्दती आणि इंडस्ट्री ओरिंएटेंड प्रकल्पांमध्ये उल्लेखन्नीय सहभाग नोंदविला. त्यांच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळे डीकेटीईसह इचलकरंजीचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे.
डीकेटीई संस्थेचे जगभरातील ३१ हून अधिक नामांकित विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार असून, सॅक्सॉन विद्यापीठाशी असलेला करार विशेषत्वाने विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणारा ठरतो. सॅक्सॉन युनिव्हर्सिटी हे नेदरलँड येथील उच्च शिक्षणासाठी नामांकित विद्यापीठ आहे.
या कराराअंतर्गत विद्यार्थी विनिमय, संयुक्त संशोधन, सेमिनार व कार्यशाळा यांसरख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते.
निवड झालेल्या विद्यार्थिनंींना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळा, प्रगत सॉफटवेअर्स, तसेच नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्यांनी सहाव्या सेमिस्टरची परिक्षा सॅक्सॉन विद्यापीठात यशस्वीरित्या पूर्ण केली असून सातव्या सेमिस्टरसाठी ०१ ऑगस्ट २०२६ रोजी डीकेटीईमध्ये सदर विद्यार्थी पुन्हा रुजू होणार आहेत. डीकेटीई ही एम्पावार्ड अॅटोनोमास संस्था असल्यामुळे निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मिळालेले मार्कस क्रेडीटच्या स्वरुपात येथील डीकेटीईच्या मार्कशिटमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.
वस्त्रोद्योग क्षेत्रात झपाटयाने होणारे तांत्रिक बदल, जागतिक ट्रेंडस व इंडस्ट्री अपेक्षा समजून घेण्यासाठी अशा परदेशी शिक्षण अनुभवाचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे. उद्योगभेटी, संशोधन व प्रत्यक्ष उदयोगसंवादामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरला आंतरराष्ट्रीय दिशा मिळत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे सर्व ट्रस्टी यांनी अभिनंदन केले. सदर यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.सौ. एल.एस. आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील व डॉ. व्ही.के.ढंगे यांचे मार्गदर्शन लाभले.
🔲 इचलकरंजीसारख्या शहरातून नेदरलँडपर्यंतचा शैक्षणिक प्रवास अत्यंत समृध्द करणारा ठरला. विविध देशांतील विद्यार्थ्यांबरोबर शिकताना जागतिक संस्कृती, प्रगत तंत्रज्ञान आणि संशोधन पध्दतीचा जवळून अनुभव घेता आला. डीकेटीईमुळे मिळालेली ही संधी आमच्या भविष्यासाठी मोलाची ठरली. असे सानिका कोईक यांनी सांगितले.