SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
साखर कारखान्यांना विशेष आर्थिक पॅकेज द्या : आमदार सतेज पाटील यांची मागणी : विधिमंडळात लक्षवेधीद्वारे वेधले लक्षघराघरात अस्मितेसोबत मराठी ज्ञानभाषा करणेमायमराठीच्या उद्याच्या भविष्यासाठी आवश्यकमहास्वच्छता मोहीमेत 30 टन कचरा संकलित; स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवी संस्था, नागरिक व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभागघरफाळा थकबाकीपोटी मनीषा नगर येथील बारबेल्स जीम ऍ़न्ड फिटनेस सेंटर सीलहोळी लहान करा, शेणी दान करा : महापौर रुपाराणी निकम यांचे आवाहनभाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवारी १ मार्चला कोल्हापुरात होणार कार्यकर्त्यांच्या रॅलीद्वारे जल्लोषी स्वागतसंवेदनशील, रचनात्मक शिक्षणातूनच सामाजिक समावेशन शक्य: प्रा. रेणू दांडेकरडॉ. डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिकस्थानिक साहित्य व लोकसहभागातून घडते संवेदनशील वास्तुरचना : संतोष रामाणेभाषिक घोटाळे टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यापीठातील परिसंवादात सूर

जाहिरात

 

घरफाळा थकबाकीपोटी मनीषा नगर येथील बारबेल्स जीम ऍ़न्ड फिटनेस सेंटर सील

schedule27 Feb 26 person by visibility 135 categoryराज्य

कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने शहरातील ज्या मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही अशा थकबाकीदारांच्या मिळकतीवर कारवाई करण्यास महानगरपालिकेने सुरु केले आहे. त्यानुसार आज घरफाळा विभागीय कार्यालय क्र1 गांधी मैदान अंतर्गत बी वॉर्ड मनीष नगर परिसरातील यशवंत गोपाळ कांबळे यांचे बारबेल्स जीम ऍ़न्ड फिटनेस सेंटरची रक्कम रु. 12 लाख 23 हजार 192 थकबाकी असल्याने आज सीलची कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई आयुक्त के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घरफाळा विभागाने केली आहे.

तरी शहरातील सर्व थकबाकीदारांना पुन:श्च जाहीर आवाहन करणेत येते की, ज्यांनी अद्यापही आपल्या घरफाळ्याची थकीत रक्कम भरणा केलेली नाही त्यांनी आपला थकीत घरफाळा लवकरात लवकर भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे. 

अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधीत मिळकत सील किंवा मिळकतीवर बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes