SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
साखर कारखान्यांना विशेष आर्थिक पॅकेज द्या : आमदार सतेज पाटील यांची मागणी : विधिमंडळात लक्षवेधीद्वारे वेधले लक्षघराघरात अस्मितेसोबत मराठी ज्ञानभाषा करणेमायमराठीच्या उद्याच्या भविष्यासाठी आवश्यकमहास्वच्छता मोहीमेत 30 टन कचरा संकलित; स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवी संस्था, नागरिक व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभागघरफाळा थकबाकीपोटी मनीषा नगर येथील बारबेल्स जीम ऍ़न्ड फिटनेस सेंटर सीलहोळी लहान करा, शेणी दान करा : महापौर रुपाराणी निकम यांचे आवाहनभाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवारी १ मार्चला कोल्हापुरात होणार कार्यकर्त्यांच्या रॅलीद्वारे जल्लोषी स्वागतसंवेदनशील, रचनात्मक शिक्षणातूनच सामाजिक समावेशन शक्य: प्रा. रेणू दांडेकरडॉ. डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिकस्थानिक साहित्य व लोकसहभागातून घडते संवेदनशील वास्तुरचना : संतोष रामाणेभाषिक घोटाळे टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यापीठातील परिसंवादात सूर

जाहिरात

 

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवारी १ मार्चला कोल्हापुरात होणार कार्यकर्त्यांच्या रॅलीद्वारे जल्लोषी स्वागत

schedule27 Feb 26 person by visibility 246 categoryराजकीय

कोल्हापूर  : भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे रविवारी १ मार्च रोजी कोल्हापुरात आगमन होत आहे. यानिमित्त त्यांचे करवीर नगरीत दुचाकी रॅलीने जल्लोषी स्वागत करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला आहे. या संबंधी खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये २ हजार दुचाकी स्वारांची रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला.


खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक हे गेल्या पाच वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची ओळख दूरवर पसरली आहे. यापुर्वी त्यांनी फॉर्म्युला थ्री या आंतरराष्ट्रीय कार रेसिंगमध्ये उज्वल कामगिरी करत देश-विदेशातील लाखो नागरिकांची मने जिंकली आहेत. सर्वच क्षेत्रात खर्‍या अर्थाने युथ आयकॉन ठरलेल्या कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीवेळी सांगितले होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदी निवड केली.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान ठेवत, त्यांना युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं. या निवडीनंतर राज्यभरातील नागरिकांकडून कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तसेच राज्यभरातील पक्ष कार्यकर्ते, युवा वर्गात उत्साहाचं वातावरण आहे. युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवार १ मार्च रोजी मुंबईहून कोल्हापुरात आगमन होत आहे. त्यांचे जल्लोषी स्वागत करण्याच्या दृष्टीने आज भाजपा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. 

कृष्णराज महाडिक  यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड होणे हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. पक्षाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ते आपल्या कार्यक्षमतेने योग्य पध्दतीने पार पाडतील, तसेच पक्षाची भूमिका पटवून देणे आणि विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूरच्या परंपरेला साजेल असेच त्यांचे स्वागत व्हावे, अशी अपेक्षा देखील खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी स्वागत रॅलीसंबंधी माहिती दिली. दुपारी ४ वाजता छत्रपती ताराराणी चौकातून कृष्णराज महाडिक यांच्या स्वागत रॅलीला सुरूवात होणार आहे. या रॅलीत २ हजार पेक्षा अधिक दुचाकी स्वारांचा समावेश आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित होईल. त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कृष्णराज महाडिक पक्ष कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार आहेत. 

या कार्यक्रमात जनतेने उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे. कृष्णराज महाडिक यांची निवड हा संपूर्ण कोल्हापूरचा सन्मान असल्याचेही विजय जाधव यांनी सांगितले. दरम्यान कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसंच विविध समित्यांवर निवड झालेल्यांचा सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते झाला. यामध्ये विजय जाधव, सुनील वाडकर, हेमंत आराध्ये, आप्पा लाड, प्रा. जयंत पाटील, प्रशांत मोरे, प्रसाद जाधव, तानाजी पाटील यांचा समावेश होता. यावेळी जिल्हा परिषद राजवर्धन नाईक-निंबाळकर, नाथाजी पाटील, गटनेते मुरलीधर जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes