SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेदुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसलेक लाडकी योजनेचा लाभ आता अधिक सुलभ : लेक लाडकी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार : आदिती तटकरे महाराष्ट्र पोलीस दलाची पन्हाळगड ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम यशस्वीराष्ट्रीय विनोद दिन: हसण्याचे महत्त्व आणि आनंदोत्सवभाजपा जिल्हा कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात निरोगी महाराष्ट्र - सुदृढ महाराष्ट्रसाठी कार्य करणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरस्वातंत्र्य दिनानिमित्त सर्किट बेंच येथे ध्वजारोहण समारंभ महा-पल्स एआय आणि ‘आशा साथी’मुळे कोल्हापूरच्या आरोग्य व्यवस्थेला डिजिटल बळकटी : पालकमंत्री कोल्हापूर: सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण इमारतीचे उद्घाटन

जाहिरात

 

डीकेटीईकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त शहीद कुटुंबीयास मदतीचा धनादेश सुपुर्त

schedule15 Aug 26 person by visibility 210 categoryशैक्षणिक

इचलकरंजी :  डीकेटीईचा स्वातंत्र्य दिन हा नेहमीच विविध उपक्रमांनी मोठया उत्साहात साजरा केला जातो. यंदाचा ध्वजारोहण समारंभ हा शिरोळ तालुका टाकळीवाडी येथील वीर शहीद जवान रोहीत खन्नीकुडे यांच्या वीरपत्नी श्रीमती शशीकला रोहीत खन्नीकुडे व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे  पूजन करुन शहीद जवान रोहीत खन्नीकुडे यांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले. ध्वजारोहण झालेनंतरच्या कार्यक्रमात त्यांना डीकेटीई परिवार यांच्यातर्फे हौताम्य वंदन व सैनिक परिवारास कृतज्ञतानिधी समर्पण करण्यात आला.

देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणा-या वीर जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून डीकेटीईने शहीद जवान रोहीत परशुराम खन्नीकुडे यांच्या कुटुंबीयांना मदतीचा धनादेश संस्थेच्या सचिव डॉ सपना आवाडे यांच्या हस्ते  वीरपत्नी शशीकला खन्नीकुडे व त्यांच्या कुटुंबीयांकडे हा कृतज्ञतानिधी सुपूर्द करण्यात आला.

यावेळी बोलताना, डॉ सपना आवाडे यांनी, सीमेवर जवान अहोरात्र कर्तव्य बजावत असल्यामुळेच देशातील नागरिक सुरक्षित जीवन जगत आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात डीकेटीई परिवार सदैव सहभागी असून, त्यांच्या पाठीशी उभा आहे अशी भावना व्यक्त केली.
डीकेटीईने समाजाशी बांधिलकी जपत देशसेवेसाठी आपल्या बलिदानाची आहुती देणा-या महाराष्ट्रातील वीरपुत्र रोहीत परशुराम खन्नीकुडे यांना श्रध्दांजली अर्पण करीत शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबीयास कृतज्ञतानिधी दिली.

या कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल.एस.आडमुठे, उपसंचालक डॉ.यु.जे. पाटील, सोशल विभागाचे डॉ ए.आर.बलवान, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यासह हुतात्मा खन्नीकुडे कुटुंबीयांचे सदस्य उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes