सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा; शिवाजी विद्यापीठाबाहेर इंडिया आघाडीचे आक्रमक प्रदर्शन!
schedule21 Jul 26 person by visibility 140 categoryराज्य
कोल्हापूर : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी 'इंडिया' आघाडीच्या वतीने आज शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाचा आज २४ वा दिवस असून, त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर ते संसद या शांततापूर्ण मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच शिक्षण व्यवस्था संविधानाधिष्ठित, पारदर्शक आणि विद्यार्थी केंद्रित करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलकांनी विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देण्याचा प्रयत्न केला, मात्र कुलगुरूंनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यानंतर आंदोलककर्त्यांनी विद्यापीठासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन प्रतीकात्मक स्वरूपात हे निवेदन अर्पण केले.
यावेळी बोलताना सिनेट सदस्य श्वेता परुळेकर यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली. "एकवेळ शाळा बंद करायला लागली तरी चालेल, मात्र शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच हवा," अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.