SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विद्यापीठात एक दिवसीय कार्यशाळाभाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर उत्साहात प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्या : सतेज पाटील ‘गोकुळ’ कडून महिला दूध उत्पादकांसाठी ‘नारी सन्मान विमा योजना’ : चेअरमन नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी 14 वा दीक्षांत समारंभ; पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीविद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी 'केआयटी' प्रशासन खंबीर; दोषी प्राध्यापकावर तातडीने निलंबनाची कारवाई!महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमइंधन टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनकोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागरविद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

जाहिरात

 

चैतन्य बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळावर प्रशासक नियुक्त

schedule07 Mar 26 person by visibility 109 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील चैतन्य बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या व्यवस्थापनात निर्माण झालेल्या कायदेशीर पेचप्रसंगामुळे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार तारण असलेली शाळेची इमारत वित्तीय संस्था अॅक्सीलो फिनसर्व्ह यांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात संस्थेने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने शाळेचे शैक्षणिक कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासक नियुक्त करण्याचे निर्देश दिले. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करावे आणि पालकांना परिस्थितीची माहिती द्यावी, असेही आदेश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या आदेशानुसार पंचायत समिती हातकणंगले येथील शिक्षण विस्तार अधिकारी नम्रता गुरसाळे यांची या संस्थेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता व शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून या संस्थेत पाल्यांना प्रवेश देऊ नये, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आणि जिल्हा परिषद प्रशासनाने पालकांना केले आहे. प्रवेश घेतल्यास त्याची वैयक्तिक जबाबदारी पालकांची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes