SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीत‘फ्युचर रेडी इंजिनिअर्स प्रोग्राम २०२६–२७’चे उद्घाटनवारणा उद्योग समूहाकडून शेतकरी, कामगारांची दिवाळी गोड; दिवाळी सणानिमित्त सुमारे १२५ कोटी रुपयांचे वितरणकोल्हापूर महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याची विशेष मोहीमविनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी शहरातील 11 आस्थापने सीलकोल्हापूर : अनधिकृत फटाका विक्री केल्यास २ हजार रुपये दंड; फटाका स्टॉलसाठी निश्चित केलेल्या जागेवरच विक्रीस परवानगीगांधीनगर बाजारपेठेत दिवाळीत भारनियमन नको; करवीर शिवसेनेचा महावितरणला इशारा‘केआयटी’त सायबर सुरक्षा विषयात विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे धडे‘गोकुळ’ची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विक्रमी २१ लाख ७० हजार लिटर दूध विक्री!शिरढोण येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणीजागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिन: महत्त्व आणि जतनाची गरज

जाहिरात

 

शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 62 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाई

schedule23 Oct 26 person by visibility 224 categoryमहानगरपालिका

◼️गेल्या दहा दिवसात थकबाकीपोटी 61 लाख 44 हजार 882 रक्कम थकबाकीदारांकडून वसूल

कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभाग व उपद्रव शोध पथकाच्या चार पथकामार्फत शहर व संलग्नीत ग्रामीण भागात थकबाकीदार व अनाधिकृत नळ कनेक्शनविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहर व ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसेच अनाधिकृत नळ कनेक्शनधारकांचे कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई वेळोवेळी या पथकामार्फत करण्यात येत आहे.

याअंतर्गत गेल्या दहा दिवसात शहर पाणी पुरवठा व उपद्रव शोध पथकाने शहर व ग्रामीण भागातील कारवाईमध्ये थकबाकीपोटी 62 कनेक्शन धारकांवर कारवाई करुन कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली आहे. यामध्ये थकबाकीपोटी रु.61 लाख 44 हजार 882 रुपये वसुल केले तर 9 अनाधिकृत कनेक्शन खंडीत करण्यात आले. तसेच 1 कनेक्शनधारकाने मोटीरी वापरलेचे निदर्शनास आल्याने सदरच्या मोटर जप्त करण्यात आले आहे.

सदरची कारवाई आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांच्या आदेशाने करण्यात आली. या कारवाईमध्ये उपद्रव पथक प्रमुख बाळासाहेब पठाण, संजय चौगुले, काका बनसोडे, निरंजन चव्हाण व पाणी पुरवठाकडील लिपीक, मिटर रिडर यांच्या सहाय्याने करण्यात आली.

हि मोहीम शहर व ग्रामिण भागात अधिक तिव्रतेने राबविण्यात येणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी त्यांचे अनाधिकृत नळ कनेक्शन रितसर अधिकृत करून घ्यावे व होणारी आर्थिक दंडाची तसेच फौजदारी कारवाई टाळावी असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes