SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीत‘फ्युचर रेडी इंजिनिअर्स प्रोग्राम २०२६–२७’चे उद्घाटनवारणा उद्योग समूहाकडून शेतकरी, कामगारांची दिवाळी गोड; दिवाळी सणानिमित्त सुमारे १२५ कोटी रुपयांचे वितरणकोल्हापूर महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याची विशेष मोहीमविनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी शहरातील 11 आस्थापने सीलकोल्हापूर : अनधिकृत फटाका विक्री केल्यास २ हजार रुपये दंड; फटाका स्टॉलसाठी निश्चित केलेल्या जागेवरच विक्रीस परवानगीगांधीनगर बाजारपेठेत दिवाळीत भारनियमन नको; करवीर शिवसेनेचा महावितरणला इशारा‘केआयटी’त सायबर सुरक्षा विषयात विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे धडे‘गोकुळ’ची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विक्रमी २१ लाख ७० हजार लिटर दूध विक्री!शिरढोण येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणीजागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिन: महत्त्व आणि जतनाची गरज

जाहिरात

 

अर्जुनवाड येथील आरोग्य शिबिरात ५९५ नागरिकांची तपासणी

schedule25 Oct 26 person by visibility 337 categoryसामाजिक

◼️आरोग्य अभियानातील आजअखेर लाभार्थ्यांची संख्या १० हजार ७६८ वर

शिरोळ : सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानांतर्गत अर्जुनवाड येथे आयोजित आरोग्य शिबिरात ५९५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या शिबिरामुळे अभियानातील आजअखेरच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या १० हजार ७६८ वर पोहोचली आहे.

आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, विविध आजारांचे वेळेत निदान करणे आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, नागरिकांना आपल्या गावातच मोफत आरोग्य व नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणीचा लाभ मिळत असून, आरोग्यविषयक तक्रारींचे वेळीच निदान करण्यास मदत होत आहे.
अर्जुनवाड येथील शिबिरप्रसंगी प्रवीण चौगुले, नंदकुमार पाटील, प्रकाश चौगुले, अमोल चौगुले, अशोक चौगुले, विकास पाटील, उमेश खोत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes