SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शाही दसरा महोत्सवाचा भाविक - नागरिकांनी आनंद घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोडमनकर्णिका कुंडाचा ऐतिहासिक ठेवा भाविकांसाठी लवकर खुला करा; संवर्धनाच्या कामाला गती देण्याच्या आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचनाहरोली येथील आरोग्य शिबिरात ४९० नागरिकांची तपासणी'विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता जोपासावी' : निवृत्त मेजर रत्नाकर तिराळे यांचे आवाहनशक्तीपीठ महामार्गाविरोधात १३ जिल्ह्यांचा एल्गार; लातूर, हिंगोलीतून ठिणगी पडणार. शिरोळमधून युतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदानाची ग्वाहीविरोधकांना आताच ‘पी. एन.’ गटाचा पुळका का आला?गोकुळ संपवणे हाच महायुतीचा अजेंडा : आमदार सतेज पाटील; चुये येथे राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबत संवाद कौशल्ये विकसित करावीत : अकिब शेखआंतरराष्ट्रीय बालिका दिन: मुलींच्या सबलीकरणाचा संकल्प

जाहिरात

 

हरोली येथील आरोग्य शिबिरात ४९० नागरिकांची तपासणी

schedule11 Oct 26 person by visibility 121 categoryआरोग्य

◼️आजअखेर आरोग्य अभियानात ५ हजार ७९४ नागरिकांनी घेतला लाभ

हरोली : सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने हरोली येथे आयोजित मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरात ४९० नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २९३ नागरिकांची आरोग्य तपासणी, तर १९७ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. 

या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळाला. या आरोग्य शिबिराला अजय पाटील यड्रावकर यांनी भेट दिली.
स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आरोग्याबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आरोग्यविषयक तपासणी करून घेता यावी, या उद्देशाने विविध गावांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

हरोली येथील शिबिरात ४९० नागरिकांची तपासणी झाल्याने या अभियानांतर्गत आजअखेर तपासणी झालेल्या नागरिकांची एकूण संख्या ५ हजार ७९४ झाली आहे. नांदणी येथे झालेल्या शिबिरात ६१२ नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर हरोली येथील शिबिरात ४९० नागरिकांनी लाभ घेतल्याने अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हरोली येथील शिबिरावेळी सरपंच तानाजी माने, भरत चौगुले, रामगोंडा पाटील, शांतिनाथ पाटील, राजकुमार कांबळे, रोहित कांबळे, स्वप्नील पाटील, नेमिनाथ चौगुले, मनोज चौगुले, प्रशांत चौगुले, गोविंद गुजरे, जबुकुमार चौगुले, राजगोंडा पाटील, अशोक मेस्त्री, रावसाहेब पाटील, तेजस पाटील, जगदीश जाधव, शिकंदर मुजावर, मारुती साळोखे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes