SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शाही दसरा महोत्सवाचा भाविक - नागरिकांनी आनंद घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोडमनकर्णिका कुंडाचा ऐतिहासिक ठेवा भाविकांसाठी लवकर खुला करा; संवर्धनाच्या कामाला गती देण्याच्या आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचनाहरोली येथील आरोग्य शिबिरात ४९० नागरिकांची तपासणी'विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता जोपासावी' : निवृत्त मेजर रत्नाकर तिराळे यांचे आवाहनशक्तीपीठ महामार्गाविरोधात १३ जिल्ह्यांचा एल्गार; लातूर, हिंगोलीतून ठिणगी पडणार. शिरोळमधून युतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदानाची ग्वाहीविरोधकांना आताच ‘पी. एन.’ गटाचा पुळका का आला?गोकुळ संपवणे हाच महायुतीचा अजेंडा : आमदार सतेज पाटील; चुये येथे राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबत संवाद कौशल्ये विकसित करावीत : अकिब शेखआंतरराष्ट्रीय बालिका दिन: मुलींच्या सबलीकरणाचा संकल्प

जाहिरात

 

शाही दसरा महोत्सवाचा भाविक - नागरिकांनी आनंद घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

schedule11 Oct 26 person by visibility 108 categoryराज्य

कोल्हापूर  : पावित्र्याचा, मांगल्याचा उत्सव म्हणजेच पर्यायाने नवरात्र महोत्सवाला रविवारपासून प्रारंभ झाला. या महोत्सवाचा भाविक - नागरिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी केले.

     राज्य शासनाचचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग,जिल्हा प्रशासन व दसरा महोत्सव समिती कोल्हापूरच्यावतीने भवानी मंडप येथे शाही दसरा महोत्सवाचे उद्घाटन रोपाला पाणी घालून व शस्त्र पूजन करून जिल्हाधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर जिल्हाधिकारी अजय पवार, शिवाजी विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू प्रा.ज्योती जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव,मनपा उपायुक्त परितोष कंकाळ,क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख,तहसीलदार तेजस्विनी पाटील,मंदिर समिती सचिव वर्षा साळुंखे आदी उपस्थित होते.


  जिल्हाधिकारी म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून राज्य शासनाने नवरात्र महोत्सवाला प्रमुख राज्य महोत्सव म्हणून जाहीर केले आहे. 11 ते 20 ऑक्टोबर या नवरात्र महोत्सव कालावधीत जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमामध्ये कोल्हापूरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवावा. तसेच यंदा दुष्काळ सदृश्य स्थिती असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा त्याचबरोबर दुष्काळाची जाण ठेवावी असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. तत्पूर्वी उदय गायकवाड यांनी या महोत्सव आयोजना पाठीमागील भूमिका विशद केली.

      या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शाहीर आझाद नाईकवाडी यांनी शाहिरी पोवाडा सादर केला तर कोल्हापूर जिल्हा दांडपट्टा - लाठी असोसिएशनचे अध्यक्ष पंडित पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली साहसी मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक खेळाडूंनी सादर केले. या प्रात्यक्षिकाला जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित मान्यवर व नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात मनमुराद दाद दिली.यावेळी पोलंडहून आलेल्या युवा विद्यार्थी शिष्टमंडळ समूहाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

  याप्रसंगी माय भारतचे उपसंचालक राहुल डोंगरे, राष्ट्रीय सेवा आयोजनाचे संचालक डॉ.कबीर खराडे, नायब तहसीलदार नितीन धापसे-पाटील ,प्रमोद पाटील , अजेय दळवी यांच्यासह भाविक व इतर कलाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes