SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर हादरले: शिंगणापुरात नदीत बुडून ४ वर्षीय चिमुल्याचा दुर्दैवी मृत्यूफ्लिपकार्टमध्ये डीकेटीईच्या एमबीएच्या पंधरा विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवडशाहू विचारांचे भाष्यकार ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांना (मरणोपरांत) ४० वा 'राजर्षी शाहू पुरस्कार' जाहीरड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार:पालकमंत्री हसन मुश्रीफकोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरूखेत बचाव अभियान अंतर्गत कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे प्रशिक्षणखरीप हंगामासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देशकोल्हापुरात मोफत 'वॉटर रेस्क्यू' प्रशिक्षण: दिनकर कांबळे यांचा पुढाकारकोल्हापुरात 'इनर व्हील क्लब'तर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बसथांब्याचे लोकार्पणसुवर्णतुला: हिंदवी स्वराज्याच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात

जाहिरात

 

वारणेच्या यशात कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा : आमदार डॉ विनय कोरे; वारणा दूध संघाच्या २९ निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

schedule03 Jun 26 person by visibility 361 categoryउद्योग

वारणानगर : सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी कर्मचाऱ्यांकडे 'कार्यकर्ते' म्हणून पाहिले. वारणेच्या यशात कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. कर्मचारी संघाच्या सेवेतून निवृत्त होत असले तरी ते आजन्म वारणा परिवाराचे घटक राहिले आहेत. ते कधीच निवृत्त होत नाहीत.असे मत वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ विनय कोरे यांनी येथे व्यक्त केले.

तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध संघाच्या २९ निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी डॉ. कोरे बोलत होते. 

कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी स्वागत करुन निवृत्त कर्मचाऱ्यांचा संघसेवेचा लेखाजोखा मांडला. अध्यक्ष एच. आर. जाधव यांनी कर्मचाऱ्यांनी निवृत्तीनंतरही वारणा समुहाशी नाते घट्ट ठेवले आहे. अन्य संस्थांच्या तुलनेत संस्थेने नेहमीच कर्मचाऱ्यांचे सर्वोतोपरी हित जोपासले आहे. याची जाणीव ठेवावी असेही त्यांनी आवाहन केले.


संघटनेचे सचिव लालासाहेब देसाई, सेवानिवृत्त सेवक विलास  शिर्के,  संजय पाटील, भिकाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 
उपाध्यक्ष ॲड एन. आर. पाटील संचालक शिवाजी कापरे, अभिजीत पाटील, शिवाजी जंगम, अरुण पाटील, प्रदीप देशमुख,  राजवर्धन मोहिते, महेंद्र शिंदे, दीपक पाटील, लालासाहेब पाटील, कृष्णा पाटील, माधव गुळवणी, डॉ. मिलींद हिरवे, विश्वास पायमल, सागर पाटील, अधिकराव पाटील, संजय देसाई, नाजिया मुल्ला, तेजस्विनी पाटील, पंचायत समिती सदस्या मनिषा पाटील, कोडोली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शितल बसरे यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना करोशी यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes