SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘बेस्ट परफॉर्मिंग युनिव्हर्सिटी’ अवार्डगोकूळ दूध संघ निवडणूक: महायुतीचे जागावाटप जाहीर; राष्ट्रवादी सर्वाधिक ९ जागांवर लढणार!देशात लोकशाही संपवून हुकूमशाही सुरू; मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा: आमदार सतेज पाटील यांचा घणाघातकोल्हापूर : नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मी मंदिर परिसरासह शहरात विशेष स्वच्छता मोहीमकोल्हापूर : पाणीपट्टी थकबाकी व अनधिकृत कनेक्शनवर कारवाई; उपद्रव शोध पथकाकडून 1.20 कोटींची वसुलीकोल्हापूर : जोतिबा रोड ते महाद्वाररोड परिसरातील हातगाड्यांवर कारवाईसमाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्याची जबाबदारी कलावंतांवर: अभिनेते डॉ. मिलिंद शिंदेवंचितांचा सिनेमा म्हणजे केवळ दुःखाचे चित्रण नव्हे : अविनाश भालेजागतिक अभिजात भाषांच्या अनुषंगाने २८ पासून दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदशिवाजी मार्केट फेरीवाला सर्वेक्षण: मुदतवाढ व फॉर्म वाटपासाठी स्वतंत्र व्यवस्था करा : नगरसेवक आश्किन आजरेकर

जाहिरात

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या लोकसेवेच्या निमित्ताने भाजपा कोल्हापूरच्या वतीने ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

schedule07 Oct 26 person by visibility 286 categoryराजकीय

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून देशसेवेला दिलेल्या २५ वर्षांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, कोल्हापूरच्या वतीने ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात संपन्न झाली. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यात्रेला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

दसरा चौक येथून ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. व्हिनस कॉर्नर, असेंब्ली रोड, महावीर गार्डन, खानविलकर पेट्रोल पंप मार्गे ही यात्रा भाजपा जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क येथे पोहोचली.

भाजपा जिल्हा कार्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या लोकसेवेवर आधारित आकर्षक ‘सेवा ज्योती’ रांगोळी साकारण्यात आली होती. वंदे मातरम् आणि महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह संबोधन मोठ्या स्क्रीनवर ऐकले.

यावेळी नरेंद्र मोदी यांनी “सेवा हीच राष्ट्रनिर्मितीची खरी शक्ती असून, जनसेवेच्या माध्यमातून देशाला अधिक सामर्थ्यवान बनविण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा,” असे आवाहन केले. तसेच “विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी प्रत्येक नागरिकाने आपली भूमिका जबाबदारीने पार पाडावी,” असा संदेश दिला. तसेच विकसित भारत 2047 ही संकल्पना मूर्त स्वरूपात येण्यासाठी We Will Do it असा नारा दिला म्हणजेच सगळ्यांनी मिळून या भारत देशाला 2047 साली विकसित भारत घडवूया आणि त्या अनुषंगाने या भारतमातेची सेवा करण्यामध्ये प्रत्येक भारतीयांनी स्वतःचे योगदान द्यावे असे देखील संबोधित केले.

भाजपा जिल्हाध्यक्ष नगरसेवक विजय जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थितांना संबोधन केले. पक्षाचे आगामी संघटनात्मक कार्यक्रम बूथ स्तरापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच आगामी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक वेळ देऊन मतदारांशी संपर्क वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रेडेकर (छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेता), वैष्णवी पवार (राष्ट्रीय खो-खो सुवर्णपदक विजेती) आणि वृंदा भुतडा (राष्ट्रीय योग सुवर्णपदक विजेती) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

‘सेवा ज्योती यात्रा’च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सेवाभावी कार्याचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी भाजपा खासदार धनंजय महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राहुल आवाडे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, नाथाजी पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, महेश जाधव, राहुल चिकोडे, विराज चिखलीकर, हेमंत आराध्ये, अमर साठे, माधुरी नकाते, अनिल डाळ्या, सतीश पंडित, आनंद गुरव, सुशीला पाटील, शाहजी भोसले,  स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेवक विजयसिंह खाडेपाटील, विजयसिंह देसाई, सुनील वाडकर, निलिमा शैलेश पाटील, पल्लवी देसाई, दीपा काटकर, अर्चना कोराणे, पूर्वा राणे, माधुरी व्हटकर, रेखा उगवे, मामा कोळवणकर, दिलीप मेत्रानि, दिलीप बोंद्रे मंगला निपाणीकर, निलेश देसाई, विजय आगरवाल, शिवाजी बुवा यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes