लिव्ह इन रिलेशिनशिपमधील वादातून सरनोबतवाडीमध्ये युवतीचा खून
schedule03 Jun 25 person by visibility 336 categoryगुन्हे

कोल्हापूर : लिव्ह इन रिलेशिनशिपमधील वादातून सरनोबतवाडीमध्ये कसबा बावडा (ता. करवीर) येथील युवतीचा खून झाला. समीक्षा उर्फ आर्या भारत नरसिंगे बागडी असे या युवतीचे नाव आहे. संशयीत आरोपी सतीश यादवने समिक्षा नरसिंगेची चाकून भोकसून खून केला असून फरारी आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
कसबा बावडा येथील समिक्षाचा कोल्हापुरातील एका तरूणाबरोबर विवाह झाला होता. त्यानंतर त्यांच्यात वितुष्ट आलं. बी ए चं शिक्षण पूर्ण करून, समिक्षानं इव्हेंटमॅनेजमेंटचं काम करण्यास सुरवात केली. काही महिन्यापूर्वी तिची ओळख सतीश यादव याच्याशी झाली होती. ते दोघेजण लिव्ह इन रिलेशिनशिप मध्ये राहत होते.
गेल्या काही दिवसांपासून समिक्षा आणि सतीश यांच्यामध्ये खटके उडू लागले. त्यामुळं वैतागून समिक्षा आणि तिची मैत्रिण आयषु या दोघी कसबा बावड्यातील आईच्या घरी राहत होत्या. गेल्या तीन दिवसांपासून सत्तीश यादव आयषु हिला वारंवार फोन करून समिक्षाला भेटायचं असल्याचं सांगत होता. आज दुपारी एक वाजता समिक्षा आणि आयषु दुचाकीवरून सरनोबतवाडी इथल्या फ्लॅटवर गेल्या. तिथं सतीश यादव आला. रागात असलेल्या सतीश यादवनं अचानक त्याच्याकडील चाकूनं समिक्षावर हल्ला केला. त्याला रोखण्यासाठी आयषुनं प्रयत्न केला. मात्र तिच्याही हाताला जखम झाली. अशातच सतीशनं समिक्षाच्या छातीमध्ये भोकसल्यानं ती जमिनीवर कोसळली.
सीपीआर मध्ये समिक्षाला दाखल केलं. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.