SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुस्लिम बांधवांची ईदुल-अजहा (बकर ईद) शनिवारी, नमाज वेळापत्रकसस्पेन्स थ्रीलर 'शातिर - द बिगिनिंग' येत्या 13 जून रोजी होणार प्रदर्शितकोल्हापुरात सोमवारी, मंगळवारी पाणी पुरवठा बंद; काळम्मावाडी पंपिंग स्टेशनची होणार दुरुस्तीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या वीज प्रश्नांवर सोमवारी जनता दरबार; तक्रार अर्ज दाखल करण्याचे आवाहनशिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'आप'तर्फे रक्तदान शिबिर; 56 रक्तदात्यांनी केले रक्तदानशिवराज्याभिषेक दिनी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना मानाचा मुजराशिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनविकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती रॅली

जाहिरात

 

लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण : समीक्षाचा खून, सतीश यादवची आत्महत्या

schedule05 Jun 25 person by visibility 414 categoryगुन्हे

कोल्हापूर : लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरणातून समीक्षा नरसिंगे  या युवतीचा खून केलेल्या सतीश यादव तरुणाने  गळफास घेऊन आत्महत्या केली.  त्याचा मृतदेह शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे कातळापुडी येथे आज गुरुवारी (दि.५) आढळून आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, प्रेयसी समीक्षा भारत नरसिंगे (वय 23, रा. जय भवानी गल्ली, कसबा बावडा) हिचा खून केलेला प्रियकर सतीश मारुती यादव (सध्या रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर, मूळ रा. पेंद्रेवाडी, उंड्री ता. पन्हाळा) हा घटनेनंतर पसार झाला होता. पोलिसांनी पथके तयार करून त्याचा शोध घेत होते. 

लिव्ह इनमध्ये राहून लग्नाला नकार देत असल्याच्या रागातून यादव याने मंगळवारी (दि. ३) दुपारी  समीक्षा हिचा चाकूने भोसकून खून केला होता. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी चार पथके तैनात केली होती. त्याचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांना लोकेशनही सापडत नव्हते. दरम्यान आज सचिन यादव याचा मृतदेह शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे कातळापुडी येथे आज गुरुवारी आढळून आला. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes